Lok Sabha Election 2024 : भाजप 400 पार...छे! राहुल अन् प्रियांका गांधींनी सांगितला नेमका आकडा

NDA Vs India Alliance News : निवडणुकीत भाजपला 370, तर एनडीएला 400 हून अधिक जागा मिळतील, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. इंडिया आघाडी मात्र आपलीच सत्ता येणार असल्याचे सांगत भाजपचा दावा फेटाळून लावत आहे.
Priyanka Gandhi, Rahul Gandhi
Priyanka Gandhi, Rahul GandhiSarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदान दोन दिवसांवर आले आहे. या टप्प्यापासून भाजप आणि मित्रपक्ष चांगली कामगिरी करणार असल्याचा दावा या पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. एनडीए 400 पारचा नारा सत्ताधारी भाजपने दिला आहे, तर विरोधकांनी या दाव्याची अनेकदा खिल्ली उडवली आहे. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी भाजपला नेमक्या किती जागा मिळणार, हा आकडाच सांगून टाकला आहे.

राहुल (Rahul Gandhi) आणि प्रियांका हे दोघे बहीण-भाऊ देशभरात प्रचारासाठी फिरत आहेत. काँग्रेसच्या (Congress) प्रचाराची संपूर्ण भिस्त या दोघांवरच आहे. देशात इंडिया आघाडीची हवा असल्याचा दावा या दोघांकडूनही केला जात आहे. मागील दहा वर्षांत मोदी सरकारमुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले, महागाई वाढले, महिलांची असुरक्षितता असे मुद्दे घेऊन काँग्रेसचे नेते प्रचार करत आहेत.

Priyanka Gandhi, Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : अमेठी की रायबरेलीतून लढणार? राहुल गांधींनी वाढवला सस्पेन्स...

आज मीडियाशी बोलताना या दोघांनीही 'एनडीए'ला किती जागा मिळणार याबाबत भाष्य केले आहे. राहुल गांधी म्हणाले, भाजप केवळ 150 जागांपर्यंतच विजय मिळवू शकेल. मागील 15 ते 20 दिवसांपर्यंत मला वाटत होते की, भाजपला 180 च्या जवळपास जागा मिळतील. पण आता 150 जागा मिळू शकतील, असे वाटते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रियांका गांधींनीही (Priyanka Gandhi) भाजपचा आकडा 200 पार जाणार नाही, असा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, ईव्हीएममध्ये गडबड झाली नाही तर भाजप 180 हून जागा जिंकू शकणार नाही. ते 400 पार जाणार असल्याचा दावा कशाच्या आधारावर करत आहेत, हे त्यांना चांगले माहिती आहे. त्यांनी आधीच काही गडबड केली आहे, त्यामुळे 400 पारचा दावा करत आहेत, अशा निशाणा प्रियांका यांनी साधला.

अमेठी, रायबरेलीबाबत संभ्रम

काँग्रेसकडून अद्याप रायबरेली आणि अमेठीतील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. या मतदारसंघांसाठी प्रियांका की राहुल यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याबाबत उत्सुकता आहे. आज राहुल यांनीही याबाबत बोलताना सस्पेन्स कायम ठेवला. ‘काँग्रेस निवडणूक समिती आणि काँग्रेसचे अध्यक्ष जे मला सांगतील ते मी करेन, असे म्हणते थेट उत्तर देण्याचे टाळले.

R

Priyanka Gandhi, Rahul Gandhi
Congress: 'या' राज्यात काँग्रेसच्या 'हाती' भोपळा? ओपिनियन पोलच्या अंदाजाने राहुल गांधींची धडधड वाढवली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com