Tamil Nadu OBC demand : शैक्षणिक, नोकरीतील आरक्षणासाठी अनेक समाज विविध प्रवर्गांमध्ये समाविष्ठ करण्याची मागणी करत असतात. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये विविध समाजातील लोक त्यासाठी रस्त्यावरून उतरून आंदोलन करतात. पण देशातील एका समाजाने चक्क अनुसूचित जाती प्रवर्गातून बाहेर पडण्यासाठी लढा सुरू केला आहे.
तमिळनाडूतील देवेंद्रकुल वेल्लालर म्हणजेच DKV समाजाने SC प्रवर्गाच्या यादीतून आपल्या समाजाचे नाव वगळावे, अशी अजब मागणी केल्याने देशभरात त्याची चर्चा होत आहे. 'इंडिया टुडे'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. हा समाज सध्या अनुसूचित जातीच्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. समाजातील नेत्यांचे म्हणणे आहे की, आपण अनेक वर्षांपासून एससी म्हणून ओळख पुसून टाकण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
का होतेय मागणी?
पुथिया तमिलगम या संस्थेचे संस्थापक के कृष्णासामी यांनी सांगितले की, एससी प्रवर्गातून ओबीसीमध्ये जाण्याची आमची मागणी आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गात जाण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. एससी आरक्षण मिळूनही समाजासमोर सामाजिक ओळख आणि भेदभावाची समस्या कायम आहे. आम्ही १९९६ पासून राज्य आणि केंद्र सरकारकडे आम्हाला एससीतून ओबीसी प्रवर्गात नेण्याची मागणी करत आहोत.
आमचे लोक आरक्षणामुळे काही सरकारी नोकऱ्या मिळवू शकतात. पण एससीचा टॅग आमच्या सर्वसमावेशक विकासातील अडथळा आहे. यामुळे लोक व्यवसाय करू शकत नाहीत, असे के. कृष्णासामी यांनी म्हटले आहे. तामिळनाडूमधील तेनकासीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष अनंथन अय्यासामी हेही डीकेव्ही समाजातील आहे. त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याबाबत आपली विरोधी भूमिका मांडली आहे.
मुंबई आयआयटीतील साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करू नये, अशी मागणी अय्यासामी यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमधून केली आहे. मी देवेंद्रकुला वेल्लार (डीकेव्ही) समाजातील असून तो अनुसूचित जाती (SC) म्हणून वर्गीकृत आहे. मी अत्यंत गरीब कुटुंबात वाढलो असून माझ्या लोकांचे दुःख प्रत्यक्ष पाहिले आहे. विविध समाजातील उदारमतवादी लोकांच्या कृपेने मी शिक्षण घेतले, असे अय्यासामी यांनी म्हटले आहे.
आपल्या उच्चशिक्षणाची तसेच विविध मोठ्या पंदावरील नोकरीची माहिती देत अय्यासामी सांगतात की, अनुसूचित जातीच्या समाजातून येऊन कठोर परिश्रमाने प्रगती करणे म्हणजे काय, हे माहिती असल्याने हे सांगितले. डीकेव्ही समाजाने कोणावरही अनुसूचित जाती/जमातीचे खटले दाखल न करण्याची भूमिका घेतली आहे. या कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा शस्त्र म्हणून कसा वापर केला जातो आणि त्यामुळे लोकांमध्ये वैर कसे वाढते, हे आम्ही पाहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.