Tamil Nadu political row : काँग्रेसने तमिळनाडूमध्ये सुपरस्टार विजय यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर DMK तील नेते चांगलेच भडकले आहेत. विधानसभा निवडणुकीत डीएमके आणि काँग्रेसची आघाडी होती. दोन्ही पक्ष एकत्रितपणे सत्तेत होते. लोकसभा निवडणूकही एकत्रित लढविली. पण आता पराभव झाल्यानंतर काँग्रेसने विजय यांच्या TVK पक्षाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने डीएमके नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
विजय यांच्या पक्षाला १०८ जागा मिळाल्याने बहुमतासाठी आणखी १० आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यावर डीएमकेचे प्रवक्ते सर्वनन अण्णादुराई म्हणाले, काँग्रेसने घेतलेली ही भूमिका अत्यंत चुकीची आहे, भविष्यात त्यांना याचा पश्चात्ताप होईल.
2029 मधील लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपचा पराभव करू शकतो, याचा विश्वास आहे. पण काँग्रेसच्या या निर्णयामुळे आता ते अस्थिर राजकारणाचे भागीदार बनले आहेत. आता संपूर्ण देशात काँग्रेसवर विश्वास ठेवता येणार नाही, अशी धारणा निर्माण होईल. काँग्रेसने TVK ला पाठिंबा दिल्याने आम्ही त्यांच्या या भूमिकेला पाठीत खंजीर खुपसला असे म्हटल्याचे अण्णादुराई यांनी सांगितले.
पाठिंबा देण्यासाठीची काँग्रेसने दिलेली कारणे पटण्यासारखी नाहीत. भाजप आणि RSS ला रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. काँग्रेसच्या या निर्णयाचे परिणाम संपूर्ण देशात उमटू शकतात. इतरही पक्ष इंडिया आघाडीत आहेत. निकालानंतर लगेचच काँग्रेस इतकी अविश्वसनीय ठरत असेल, जनादेशाविरोधात उभी राहत असेल तर त्याचा परिणाम अखिलेश यादव, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांच्या मनावर काय होईल?, असा सवाल अण्णादुराई यांनी केला. आम्ही कधीच काँग्रेसला धोका दिला नाही, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी अण्णादुराई यांच्या पाठीत खंजीर खुपसला या विधानावर आक्षेप घेतला. हे विधान दुर्देवी असल्याचे म्हणाले. निवडणुकीनंतरच्या आघाड्या कशा असतात, हे त्यांना माहिती नाही. युरोपमध्ये अशी उदाहरणे आहेत. स्थिर सरकारसाठी एकसारखी विचारधारा असलेले पक्ष एकत्र येतात, असे चिदंबरम म्हणाले.
स्टॅलिन हे खूप अनुभवी नेते आहे. जमिनीवरील सतत्या ते समजून घेतील. इतर राजकीय पक्षांच्या अपेक्षा त्यांना समजतात. जे घडत आहेत, ते विचार न करता येण्याजोगे नाही. स्टॅलिन हे समजून घेतील, याची खात्री असल्याचा विश्वासही चिदंबरम यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.