West Bengal Violence : बंगालमध्ये हिंसाचार वाढताच ज्ञानेश कुमारांनी काढले आदेश; TMC कार्यालयाला आग, तोडफोड, तिघांचा मृत्यू, काय-काय घडलं?

TMC office attack BJP allegations violence WB : आसनसोलमधील हे कार्यालय स्थानिक नगरसेविका मौसमी बोस यांचे होते. आगीत कार्यालय जळून खाक झाले. त्याची झळ जवळच्या दुकानांनाही बसली.
After election results, unrest erupts in West Bengal with reports of arson and clashes as authorities step in to control the situation.
After election results, unrest erupts in West Bengal with reports of arson and clashes as authorities step in to control the situation.After election results, unrest erupts in West Bengal with reports of arson and clashes as authorities step in to control the situation.
Published on
Updated on

West Bengal post poll violence : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता खाली खेचत भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. त्यानंतर निकालाच्या दिवसापासूनच राज्यात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. भाजपप्रमाणेच टीएमसीचे कार्यकर्त्यांकडूनही हिंसाचार केल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसीची काही कार्यालये पेटवून दिल्याच्या आणि तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत.

बंगालमधील हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. तृणमूलची सत्ता जाताच बंगालमधील अनेक भागात हिंसाचार सुरू झाला आहे. मागील बहुतेक निवडणुकांनंतरही हेच चित्र पाहायला मिळाले होते. मंगळवारी आसनसोल उत्तर विधानसभा मतदारसंघातील तृणमूलचे कार्यालय पेटवून देण्यात आले. त्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

आसनसोलमधील हे कार्यालय स्थानिक नगरसेविका मौसमी बोस यांचे होते. आगीत कार्यालय जळून खाक झाले. त्याची झळ जवळच्या दुकानांनाही बसली. मुर्शिदाबादमधील जियांगज येथील अनेक दशकांपासूनची लेनिन यांच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली. भाजप समर्थकांनी ही तोडफोड केल्याचा आरोप तृणमूलच्या नेत्यांनी केला आहे.

After election results, unrest erupts in West Bengal with reports of arson and clashes as authorities step in to control the situation.
खासदारकीचा राजीनामा देत एकही आमदार नसलेल्या पक्षात प्रवेश, आता जोरदार धक्का

मंगळवारी रात्री मध्य कोलकाता येथे विजयी जल्लोष करताना कार्यकर्ते बुलजोझर घेऊन आले होते. त्यांनी टीएमसी कार्यालयाला लक्ष्य केले. तसेच काही मांसविक्रीच्या दुकानेही पाडण्यात आल्याचा आरोप होत आहे. टीएमसीचे न्यू मार्केट भागातील कार्यालय पाडण्यात आले. स्थानिक दुकानदारांमध्ये दहशत निर्माण झाली होती. अनेक व्यापारी दुकाने बंद करून पळून गेले. टीएमसीच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट केली आहे.

कोलकाता येथील ऐतिहासिक न्यू मार्केट. बंगाली परिवर्तनाचा आनंद घेत आहे, असे मोइत्रा यांनी म्हटले आहे. तर जगतबल्लभपूरमध्ये टीएमसी कार्यालयाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आग लावल्याचा दावा खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच त्यांनी टीएमसीच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

After election results, unrest erupts in West Bengal with reports of arson and clashes as authorities step in to control the situation.
West Bengal News : बंगालमध्ये मुख्य सचिवांच्या आदेशानंतर आता ‘ईडी’ची मोठी कारवाई; पोलीस उपायुक्तांभोवती फास आवळला...

ज्ञानेश कुमार सक्रीय

बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सक्रीय झाले आहे. त्यांनी तातडीने हिंसा करणारे आणि तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांना तसेच केंद्रीय सुरक्षा दलाला दिले आहेत. राज्यात ठिकठिकाणी गस्त घालण्याच्या सुचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com