CM Vijay Thalapathy Sarkarnama
देश

MLA Arrest : धक्कादायक! थेट मुख्यमंत्र्यांनाच धमकी, 'हाडं मोडेन...' म्हणणाऱ्या आमदाराला अटक

DMK MLA G V Markandeyan was arrested Over threats against Chief Minister Vijay : तामिळनाडूच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री विजय यांना धमकी दिल्या प्रकरणी विरोधी पक्षातील आमदारावर कारवाई करण्यात आली आहे.

Aslam Shanedivan

Tamil Nadu Political News : तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. एकीकडे 'ऑपरेशन एल'ची जोरदार चर्चा राज्यासह देशभर होताना दिसत असतानाच डीएमकेला मोठा धक्का बसला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना धमकी देण्यासह त्यांच्या 'तमिळ वेत्री कळघम' पक्षाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी डीएमकेचे आमदार जी. व्ही. मार्कंडेयन यांना अटक केली आहे. या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याच महिन्याच्या ३ तारखेला (जुलै) तिरुचेंदूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा माजी राज्यमंत्री अनिता आर. राधाकृष्णन यांनादेखील अटक करण्यात आली होती. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. या अटकेनंतर डीएमकेने या कारवाईचा निषेध करत सत्ताधारी पक्ष राजकीय सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, या अटकेला अवघ्या १५ दिवसांचा कालावधी लोटला नाही तोच डीएमकेला दुसरा मोठा झटका बसला आहे. मार्कंडेयन यांना मुख्यमंत्री विजय यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य करण्यासह धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सोमवारी (२० जुलै) त्यांना अटक केली.

रविवारी रात्री कोविलपट्टी येथील कृष्णन कोविल मैदानावर डीएमकेची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी मार्कंडेयन यांनी आपल्या भाषणात, "विधानसभेचे अधिवेशन बोलावल्यास त्यांची हाडे शाबूत राहणार नाहीत. डीएमकेचे आमदार त्यांची हाडे मोडून त्यांना परत पाठवतील," अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

मुख्यमंत्री विजय यांच्या विरोधात मार्कंडेयन यांनी धमकी देणारे वक्तव्य केले. सध्या त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर मार्कंडेयन यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. तसेच या वक्तव्यानंतर विजय यांच्या समर्थकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून राज्यातील परिस्थिती चिघळत असल्याचे चित्र आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आमदाराला ताब्यात घेतले. या घटनेने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मार्कंडेयन यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने पोलीस दाखल होताच एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी त्यांना अटक करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मार्कंडेयन यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. येथे मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक निवासस्थानाबाहेर जमले आणि घोषणाबाजी केली. तसेच मार्कंडेयन यांना नेणाऱ्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना हटवून मार्कंडेयन यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे नेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT