CM Vijay vs Rahul Gandhi : राहुल गांधींना धक्का; वडिलांच्या ड्रीम प्रोजेक्टला CM विजय यांचीही नकारघंटा, केस सुप्रीम कोर्टात

CM Vijay, Jawahar Navodaya Vidyalaya, Rahul Gandhi : राजीव गांधींच्या महत्त्वाकांक्षी योजनेला तमिळनाडूचा कायम विरोध; प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालयाची मागणी सुप्रीम कोर्टात, विजय-राहुल मैत्रीच्या पार्श्वभूमीवर निर्णयाकडे देशाचे लक्ष
Rahul Gandhi, C. Vijay
Rahul Gandhi, C. VijaySarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu news : तमिळनाडूमध्ये काही महिन्यांपूर्वीच पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या टीव्हीके सरकारनेही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झटका दिला आहे. त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या महत्वाकांक्षी जवाहर नवोदल विद्यालय या योजनेला मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेही रेड सिग्नल दाखविला आहे.

दिवंगत राजीव गांधी यांच्या सरकारने १९८६-८७ मध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय सुरू करण्याची योजना आणली होती. या विद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. ही शाळा निवासी असून संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलते. अद्याप एकही विद्यालय नसलेले तामिळनाडू हे एकमेव राज्य आहे.

तामिळनाडू वगळता सर्व राज्यांमध्ये नवोदय विद्यालये उघडण्यात आली आहेत. मात्र, तामिळनाडू सरकारने त्रिभाषा धोरणाला विरोध करत या विद्यालयांना सातत्याने विरोध केला आहे. राज्यात द्विभाषा म्हणजे तमिळ आणि इंग्रजी या दोन भाषांनाच प्राधान्य दिले जाते. राज्यातील आतापर्यंतच्या एआयएडीएमके आणि डीएमकेच्या सर्व सरकारांनी हेच धोरण ठेवत त्रिभाषेचा आग्रह असलेल्या नवोदय विद्यालयांना राज्यात बंदी केली होती.

Rahul Gandhi, C. Vijay
Rajya Sabha MP : संसद अधिवेशनाच्या चार दिवस आधीच खासदाराचा तडकाफडकी राजीनामा; 'इंडिया आघाडी'ला धक्का

सरकारच्या या धोरणाविरोधात कोर्टातही याचिका आहेत. एका याचिकेवर मद्रास हायकोर्टाने नुकतेच सरकारला प्रत्येक जिल्ह्यात विद्यालयांसाठी जागा देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात टीव्हीके सरकारनेही आधीच्या सरकारप्रमाणे री ओढत त्याला विरोध केला आहे. विजय सरकारने हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

सुप्रीम कोर्टात गुरूवारी झालेल्या सुनावणीदरम्यान तामिळनाडू सरकारच्या वकिलांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करत एक पत्र दिले. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती नागरत्ना यांनी तुमच्या राज्यात नवोदय विद्यालये झालीच पाहिजेत, असे सांगितले. त्यावर वकिलांनी अजून चर्चा सुरू आहे, त्यामुळे आताच काही बोलू शकत नाही, असे उत्तर दिले. इतर राज्यांमध्ये ही विद्यालये आहेत, तुम्ही तामिळनाडूला वंचित ठेवू नका, असेही न्यायमूर्तींनी सुनावले.

Rahul Gandhi, C. Vijay
BJP Politics : SIR मध्ये 20-25 हजार मतं डिलीट करून मला आमदार बनवा! भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

दरम्यान, तमिळनाडूमध्ये डीएमकेसोबत काँग्रेस आघाडीमध्ये होते. मात्र, या काळात एकही विद्यालय सुरू झाले नाही. आता विजय आणि राहुल यांच्यातील मैत्रीची बरीच चर्चा होत असते. त्यामुळे राहुल यांच्याकडून वडिलांचा ड्रीम प्रोजेक्ट राज्यात सुरू करण्याबाबत विजय यांचे मन वळविले जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com