Delhi News : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या विधेयकातील दोन तरतुदी काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, या विधेयकात आधी जनगणना केली जाईल आणि नंतर सीमांकन केले जाईल, त्यानंतरच आरक्षण लागू केले जाईल, असे म्हटले आहे. (Latest Marathi News)
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
"महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर लागू करता यावे, यासाठी या दोन्ही तरतुदी काढून टाकाव्यात, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. ते म्हणाले, "सरकारची इच्छा असेल तर हे विधेयक तत्काळ लागू करता येईल आणि येत्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी 33% पेक्षा जास्त जागा राखीव ठेवता येतील, पण सरकारची तशी इच्छाशक्ती नाही.
राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकारने स्पष्ट केले की, आधी सीमांकन आणि जनगणना होईल, त्यानंतर हे विधेयक लागू केले जाईल. महिला आरक्षण विधेयक 10 वर्षांनी लागू होऊ शकते, असा दावा केला जात आहे. मात्र, त्यानंतरही ते लागू होईल की नाही? याबाबत कोणालाही काही माहिती नाही.
पत्रकार परिषदेत राहुल गांधींना विचारले गेले की, काँग्रेसने २०१० मध्ये आणलेल्या महिला आरक्षण विधेयकात ओबीसी कोटा देण्यात आलेला नव्हता. त्याबद्दल तुम्हाला काही खंत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, "होय, मला शंभर टक्के खेद वाटतो आणि त्याचवेळी काँग्रेसने हे करायला हवे होते."
Edited By - Chetan Zadpe
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.