Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump Oath Ceremony : मोठी बातमी! पुन्हा एकदा अमेरिकेत 'ट्रम्प पर्व' सुरू; 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

America 47 President News : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील अनेक बड्या व्यक्ती उपस्थित होते. ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी जेडी वन्स यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली

Deepak Kulkarni

America News : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा विराजमान झाले आहेत. त्यांनी स्थानिक वेळेनुसार भारतीय वेळेनुसार सोमवारी(ता.20) रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील अनेक बड्या व्यक्ती उपस्थित होते. ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी जेडी वन्स यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. भारताकडून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे या सोहळ्याला उपस्थित होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची (America) 35 शब्दांत शपथ घेतली. ते यावेळी म्हणाले, “मी शपथ घेतो की, मी युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार निष्ठापूर्वक करीन आणि माझ्या क्षमतेनुसार, संविधानाचे जतन, संरक्षण आणि रक्षण करीन. यावेळी त्यांनी त्यांच्या आईने 1955 मध्ये दिलेल्या बायबलवर हात ठेवत शपथ घेतली.

ट्रम्प यांच्या या शानदार शपथविधी सोहळ्याला जगभरातील नामवंंत 700 पाहुणे उपस्थित होते. यात भारताकडून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी उपस्थित होते. तर इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग यांच्यासह अनेक नामवंताचा समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT