Donald Trump Tariff on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. शिवाय ट्रम्प यांच्याकडून केली जाणारी वक्तव्य पाहता ते अतिरिक्त टॅरिफचा निर्णय मागे घेतील हा विचार करणं देखील कठीण झालं आहे.
कारण ट्रम्प आणि त्यांचं प्रशासन दिवसेंदिवस भारताला धमकी देताना आणि भारतावर बिनबुडाचे आरोप करताना दिसत आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारविषयक सल्लागार पीटर नवारो यांनी भारतावर गंभीर आरोप करत अकलेचे तारे तोडले आहेत.
रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला भारतच कारणीभूत असल्याचं नवारो यांनी म्हटलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध जास्त काळ सुरू असल्याचा दावा नवारो यांनी केला आहे.
शिवाय शांततेचा मार्ग भारताहून जातो असंही त्यांनी म्हटलं आहे. शांततेचा मार्ग भारताहून जातो आणि मी भारतावर खूप प्रेम करतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महान नेते आहेत. मात्र, भारताने जागतिक अर्थव्यवस्थेतील आपली भूमिका समजून घ्यावी.
भारताला रशियाकडून तेल खरेदीची आवश्यकता असल्याच्या या दाव्याला काही अर्थ नाही. तेल खरेदी केवळ नफ्यासाठी केली जात आहे. टॅरिफ लागू होण्यासाठी अवघे सहा दिवस उरले असून भारताला हा सगळा घटनाक्रम मान्य नसल्याचं दिसत आहे. भारत आता चीनसोबत जवळीक वाढवत आहे. पण ट्रम्प त्यांना टॅरिफमध्ये कुणतीही सूट देणार नाहीत, असंही नवारो म्हणाले.
तसंच भारतासह व्यापार करुन आम्हला नुकसान सहन करावं लागतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. भारत आमच्याकडून मिळणारा पैसा रशियन तेल खरेदीसाठी वापरतो आणि त्यातून मोठा नफा कमावतो. हा पैसा रशियाला युद्धासाठी शस्त्रास्त्रे बनवण्यास मदत करतो, असा दावा पीटर नवारो यांनी केला आहे.
मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे आता भारत-अमेरिकेमधील व्यापार संबंध आणखी ताणल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याआधीच अमेरिकेच्या आरोपांना आणि दाव्यांना स्पष्ट प्रत्युत्तर दिलं आहे. एस. जयशंकर म्हणाले, "रशियन तेल खरेदी करणारे सर्वात मोठे ग्राहक भारत नव्हे तर चीन आहे.
2022 नंतर रशियासोबत सर्वात जास्त व्यापार वाढवणारे दक्षिणेकडचे काही देश आहेत. शिवाय अमेरिका म्हणत असते की जगातील तेल बाजारपेठा स्थिर ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. ज्यामध्ये रशियातील तेल खरेदीचाही समावेश आहे. शिवाय भारत अमेरिकेकडूनही तेल खरेदी करतो आणि त्याचे प्रमाण वाढवत आहोत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.