Ajit Pawar : 'राष्ट्रवादीचे मंत्री नागपुरात येतात अन् विमानाने उडून जातात', अजितदादा सर्वांना वॉर्निग द्या

NCP Party Worker's Complain to Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज नागपुरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत.
Deputy CM Ajit Pawar
Deputy CM Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  • विदर्भातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे मंत्री नागपूरला येऊनही कार्यकर्त्यांना भेटत नसल्याची तक्रार केली.

  • मंत्री व अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा देण्याची मागणी करण्यात आली.

  • “पक्ष कसा वाढवायचा?” असा थेट सवाल करून पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना धडक दिली.

Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नागपूरमध्ये येतात. रविभवन येथे मुक्काम करतात. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांना भेटत नाही. बैठका घेत नाहीत. अधिकाऱ्यांकडे आम्हाला घेऊन जात नाही आणि आमचे कामे मार्गी लावत नाहीत. ते नागपूर येतात आणि विमानाने उडून जातात अशी तक्रार करून विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. अशा परिस्थितीत आम्ही पक्ष कसा वाढवायचा, कार्यकर्त्यांना कसे जोडून ठेवायचे ते तुम्हीच सांगा अशी विचारणा करून मंत्री व अधिकाऱ्यांना वॉर्निंग द्या अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

अजित पवार यांनी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी प्रास्ताविक करताना नागपूरचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री नागपूर जिल्ह्याकडे दुर्लक्ष करतात, नागपूरच्या पदाधिकाऱ्यांना वाळीत टाकले असल्याची तक्रार केली. ही माझी तक्रार नाही तर सर्वांच्या याच भावना असल्याचे प्रशांत पवार म्हणाले. या बैठकीला आमदार संजय खोडके, आमदार राजू कारेमोरे, आमदार राजकुमार बडोले, माजी आमदार नाना पंचबुद्धे, नागपूरचे निरीक्षक राजू जैन प्रामुख्याने उपस्थित होते.

Deputy CM Ajit Pawar
Ajit Pawar : अजितदादा वळून पाहतात अन् म्हणतात, I Love you too...; काय घडला प्रसंग जाणून घ्या?

राज्यमंत्री इंद्रनील नाईक नागपूरमध्ये अनेकदा रविभवन येथे मुक्कामाला असतात. मात्र आम्हाला भेटत नाही. आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी नागपूरच्या पदाधिकाऱ्यांना भेटत जा असे त्यांना सांगावे लागले असे पवार यांनी यावेळी अजित दादा यांना सांगितले. नागपूर महापालिकेचे प्रशासक आहेत. ते फक्‍त विशिष्ट पक्षाच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांनाच भेटीसाठी वेळ देतात. राष्ट्रवादी काँग्रेसने दहीहंडीसाठी मागितलेली परवानगीसुद्धा त्यांनी नाकारली. नागपूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले.

त्यानंतर आम्ही निवेदन द्यायला नागपूर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यांच्याकडे गेलो. त्यांना भेटण्यास नकार दिला. शेवटी आम्ही जो पर्यंत भेट देणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या कक्षासमोरच भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर ते लगेच पाच मिनिटात भेटायला आले असेही यावेळी प्रशांत पवार यांनी सांगितले.

नागपूरमधील राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याला साधे विशेष कार्यकारी अधिकारी करण्यात आले नही. जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला जात नाही. अशा परिस्थिती आम्ही पक्ष कसा वाढवायचा असा सवाल त्यांनी केला. कोणाचे पाठबळ नसताना नागपूर जिल्ह्यात 1800 बूथ केले. सर्व बूथ कार्यकर्त्यांची नावे, फोन नंबर, आधार कार्ड नंबर, मतदार क्रमांकासह नोंदी आमच्याकडे आहे.

केवळ कागदोपत्री कारवाई केली नाही असे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. अशाही परिस्थिती आमची महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची तयारी आहे. मात्र आपलेच मित्र पक्ष आम्हाला कमी लेखतात. चादर पाहून पाय पसरवा असा सल्ला देतात. आम्ही नागपूर महापालिकेमध्ये 40 जागांची मागणी केली. अनेक कार्यकर्त्यांची विजय खेचून आणण्याची क्षमता आहे. महायुती झाली नाही तर आपल्या ताकदीवर लढण्याची सर्वांची क्षमता आहे. महायुती झाल्यास आपल्या कार्यकर्त्यांचे तिकीट कापून त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नका अशी विनंतीही प्रशांत पवार यांनी यावेळी केली.

Deputy CM Ajit Pawar
Ajit Pawar NCP: अजितदादांच्या विदर्भ दौऱ्यापूर्वीच गंभीर आरोप, राष्ट्रवादीत उडाली खळबळ; 'सत्तेत असूनही...'

FAQs :

प्र.१: विदर्भातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची मुख्य तक्रार काय होती?
उ: मंत्री नागपूरला येतात पण कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, बैठक घेत नाहीत आणि कामे मार्गी लावत नाहीत अशी तक्रार करण्यात आली.

प्र.२: पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे काय मागणी केली?
उ: त्यांनी मंत्री व अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांची कामे न सोडवल्यास वॉर्निंग द्यावी अशी मागणी केली.

प्र.३: कार्यकर्त्यांनी अजित पवारांना कोणता प्रश्न विचारला?
उ: “पक्ष कसा वाढवायचा आणि कार्यकर्त्यांना कसे जोडून ठेवायचे?” असा थेट सवाल करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com