US President Donald Trump speaks about the Iran peace deal and denies reports of a $300 million aid package. The statement has sparked new debate over the future of the US-Iran agreement. Sarkarnama
देश

Trump Iran Peace Deal : ट्रम्प यांनी इराणसह जगाचं टेन्शन पुन्हा वाढवलं! शांतता करारातील 'ती' बातमी खोटी असल्याचं केलं स्पष्ट

US Iran Nuclear Agreement : जर अमेरिका इराणला कोणतीही आर्थिक मदत देणार नसेल, तर गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांचे नेमके स्वरूप काय होते? तसेच, ट्रम्प यांच्या या भूमिकेवर इराणची प्रतिक्रिया काय असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jagdish Patil

Trump Iran Peace Deal : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपुष्टात आल्याची घोषणा झाल्यानंतर जगभरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणसोबत शांतता करार झाल्याचे संकेत दिल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र, आता ट्रम्प यांच्या एका नव्या पोस्टमुळे या कराराबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. शांतता कराराच्या मसुद्यातील १४ अटींची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यामध्ये अमेरिका इराणला ३०० मिलियन डॉलर्सची आर्थिक मदत देणार असल्याची अट असल्याच्या बातम्या विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, ट्रम्प यांनी हा दावा फेटाळून लावत अशा बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प काय म्हणाले?

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “इराणने कधीही अण्वस्त्रे बाळगणार नसल्याचे मान्य केले आहे. तसेच अमेरिका इराणला ३०० मिलियन डॉलर्स देणार असल्याच्या बातम्या या विरोधकांकडून पसरवण्यात आलेल्या खोट्या अफवा आहेत.”

ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर अमेरिका इराणला कोणतीही आर्थिक मदत देणार नसेल, तर गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांचे नेमके स्वरूप काय होते? तसेच, ट्रम्प यांच्या या भूमिकेवर इराणची प्रतिक्रिया काय असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील महत्त्वाच्या शांतता करारावर येत्या काही दिवसांत अंतिम सह्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील ४८ तासांत कराराचा सविस्तर तपशील जाहीर होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. हा करार अंतिम झाल्यास पश्चिम आशियातील दीर्घकाळापासून सुरू असलेला तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.

मात्र, इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा अद्यापही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दोन्ही देशांनी प्राथमिक स्तरावर कराराला मान्यता दिल्याचे सांगितले जात असले, तरी अणुकार्यक्रमासंदर्भातील चर्चा स्वतंत्रपणे सुरू राहणार असल्याचं सांगण्यात येत आह.

अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी केलेला अण्वस्त्रांबाबतचा दावा आणि आर्थिक मदतीसंदर्भातील स्पष्टीकरण यामुळे करारातील अंतिम अटी नेमक्या काय असतील, याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि इराण यांच्यातील या महत्त्वाच्या कराराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT