US Iran Peace Deal : अखेर संपूर्ण जगाचा जीव भांड्यात पडला! ट्रम्प यांच्याकडून युद्ध संपल्याची घोषणा, इराणचीही सहमती, 'या' तारखेला अधिकृत सह्या होणार

Donald Trump Iran agreement : 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबत डील पूर्ण झाली आहे. सर्वांचं अभिनंदन. मी घोषणा करतो की होर्मुझची सामुद्रधुनी देखील टोल फ्री सुरु होईल आणि अमेरिकन नौदलाला नाकाबंदी हटवण्यास मंजुरी देत आहे.'
US Iran Peace Deal | Donald Trump | Hormuz Strait
US Iran Peace Deal | Donald Trump | Hormuz StraitSarkarnama
Published on
Updated on

US Iran Peace Deal : संपूर्ण जगाला महागाईच्या झळा ज्या युद्धामुळे बसत आहेत ते अमेरिका-इराण युद्ध अखेर संपुष्टात आल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली आहे.

यावेळी त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी टोल फ्री करण्यास मंजुरी दिल्याचंही म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या नौदलाने केलेली नाकेबंदी हटवण्याचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. तर अमेरिका आणि इराण यांच्यात 10 कलमी शांतता करार झाला असून या कराराच्या मसुद्द्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या कराराद्वारे अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी परस्परांकडून प्रमुख मागण्या मान्य करवून घेतल्या आहेत. ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या घोषणेला इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलनं देखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता हे युद्ध थांबून आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन अमेरिका आणि इराणमधील शांतता कराराची घोषणा केली. यावेळी त्यांनी लिहिलं की, 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबत डील पूर्ण झाली आहे. सर्वांचं अभिनंदन. मी घोषणा करतो की होर्मुझची सामुद्रधुनी देखील टोल फ्री सुरु होईल आणि अमेरिकन नौदलाला नाकाबंदी हटवण्यास मंजुरी देत आहे.

US Iran Peace Deal | Donald Trump | Hormuz Strait
TMC Rebel MPs : ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का; 20 बंडखोर खासदारांचा गट NCPI मध्ये विलीन, बिर्लांच्या भेटीनंतर घोषणा

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधनाचा पुरवठा ज्या देशांना होतो त्या जगभरातील जहाजांनी त्यांची इंजिन सुरु करावी आणि तेलाचा पुरवठा सुरु होऊद्यात अशी ट्रम्प यांनी घोषणा केली. दरम्यान, या शांतता कराराबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी अमेरिका आणि इराण यांच्या शांतता करार झाला झाल्याचं सांगत दोन्ही देशांनी सर्व मुद्यांवर आणि लेबनॉनमधील लष्करी कारवाई थांबवण्यावर सहबती दर्शवल्याचं सांगितलं.

तसंच त्यांनी १९ जून रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे दोन्ही देश शांतता करारावर स्वाक्षरी करतील, असा दावा केला आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारामध्ये लेबनॉनसह सगळ्या ठिकाणी कायमस्वरुपी शस्त्रसंधी करण्यात येण्याची अट ठेवण्यात आली आहे. यासह अमेरिका इराणच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. ३० दिवसांच्या आत होर्मुझमधून अमेरिकेचं नौदल आणि नाकेबंदी हटवली जावी, आणि होर्मुझ इराणकडून पु्न्हा सुरु केलं जाईल.

US Iran Peace Deal | Donald Trump | Hormuz Strait
TET Exemption: शिक्षकांच्या सेवासुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पंतप्रधानांकडे धाव, 2013 पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीमधून सूट मिळणार?

इराणच्या तेल आणि उर्जा उत्पादनांवर असलेले निर्बंध हटवण्यात येतील, इराणने ते अण्वस्त्र तयार करणार नाहीत असं वचन द्यावं, अशा एकूण १४ प्रमुख अटी ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या सर्व अटी असलेल्या करारावर अधिकृतरित्या १९ जून रोजी दोन्ही देशांनी सह्या केल्यास मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com