

Teacher Recruitment News: राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पवित्र संकेतस्थळावर रिक्त पदांच्या जाहिराती नोंदवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार, शाळा व्यवस्थापनांना आता ३० जूनपर्यंत जाहिराती अपलोड करता येणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाते. त्यानुसार २०२५ सालातील शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सुरुवातीला जाहिराती नोंदवण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती वाढवून १५ जूनपर्यंत करण्यात आली होती. मात्र, काही शाळा व्यवस्थापनांकडून अधिक वेळेची मागणी करण्यात आल्याने शिक्षण विभागाने पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना त्यांच्या अखत्यारितील शिक्षकांची रिक्त पदे नोंदवण्यासाठी पवित्र संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जाहिरात नोंदणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित ई-मेलवर संपर्क साधण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. राज्यभरातील पात्र उमेदवारांचे लक्ष आता या भरतीकडे लागले असून यंदा किती जागांसाठी भरती होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षकांचे नियोजन केले जात असल्याने अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध रिक्त जागांची अंतिम संख्या निश्चित होणार आहे. त्यामुळे यंदाच्या भरतीत किती पदे उपलब्ध होतील, याचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आलेले नाही.
शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. जाहिरात देण्यास काही अडचणी असल्यास edupavitra25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.