Trump-Zelensky Clash Sarkarnama
देश

Donald Trump : ट्रम्प जग 'मुठीत' घ्यायला निघाले; 38 दिवसांत पाच देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भिडले

Trump-Zelensky Clash : शुक्रवारी (ता.28) रात्री उशिरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट झाली. यादरम्यान ट्रम्प, उपाध्यक्ष जेडी व्हेन्स आणि झेलेन्स्की यांच्यात जोरदार वादविवाद झाला.

Aslam Shanedivan

Trump in Disputes : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. रशिया-युक्रेन युद्वाबाबत ही भेट झाली होती. या भेटीनंतर रशिया-युक्रेन युद्धाऐवजी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या झालेल्या शाब्दिक चकमकीची सध्या जगभर चर्चा होत आहे. पण असे फक्त वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबतच झाले आहे असे नाही. तर गेल्या 38 दिवसांत ट्रम्प यांचे 5 राष्ट्रांच्या प्रमुखांशी देखील खटके उडाले आहेत. यामुळे आता जगभरात ट्रम्प यांना नक्की हवं काय? असा सवाल केला जातोय.

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असून शपथविधीनंतर 38 दिवसांत अमेरिकेच्या इतिहासात जे झाले नव्हते. ते ट्रम्प यांनी करत अख्या जगाचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे. व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी प्रसारमाध्यांच्या समोरच वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी वाद घातला. हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये शाब्दीक चकमक सुरू झाली. यामुळे अख्या जगात ट्रम्प असे का करत असून याधी देखील 5 राष्ट्रांच्या प्रमुखांना बोलवून त्यांच्याशी त्यांनी का पंगा घेतला, असे आता बोलले जात आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

याधी ट्रम्प यांनी दाखवली आपली ताकद

झेलेन्स्की यांच्या वादाच्या पार्श्वभूमिवर आता ट्रम्प यांच्यावर टीका सुरू झाली असून त्यांनी 20 जानेवारी 2025 ला शपथ घेतल्यानंतर पहिली भेट इज्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांची घेतली होती. त्यावेळी नेत्यानाहू भेट व्हाइट हाऊसमध्ये घेतली होती. ज्याची चांगलीच चर्चा झाली. पण यानंतर त्यांनी ज्या 5 राष्ट्रांच्या प्रमुखांशी भेटी घेतल्या त्यात त्यांनी आपली ताकद दाखवल्याचे बोलले जातेय.

ट्रम्प यांनी 11 फेब्रुवारी जॉर्डनच्या किंगची भेट घेतली. ज्यात त्यांनी आम्ही गाजावर कंन्ट्रोल आणणआर असून फिलीस्तिनींना दुसरीकडे शिप्ट करणार असल्याचे सांगितले. इतकेच काय तर आम्ही जार्डनसह इजिप्तला भरपूर पैसेही देत आलो आहोत. पण ते आता आम्हाला विरोध करतील तर त्यांची मदत रोकू असा इशारा दिला होता. यावेळी कोणताही वाद न घातला. किंग अब्दुल्ला यांनी त्यांच्या देशासाठी जे उचित असेल ते तेच करतील असे सावध उत्तर देत वेळ मारून नेली होती.

किंग अब्दुल्लानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी 14 फेब्रुवारीला अमेरिकेला गेले होते. यावेळी देखील ट्रम्प यांनी टॅक्सवरून भाष्य करताना भारताचे टॅक्स (टेरिफ) अधिक असून जे भारत लावेल ते आता आम्ही लावू असा इशारा दिला होता. तर बेकायदेशिर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना असे घालवू नये अशी मागणी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याकडे केली असता, अशापद्धतीने आमच्या घरात कोणी घुसकोरी केली तर त्याला येथे राहण्याची परवानगी नसल्याचे म्हटलं होतं.

तर फ्रान्सचे राष्ट्रपती उझल यांनी दावा केला होता की, युरोप युक्रेनला पैसे उधार देत असून आपले पैसे ही परत घेत आहे. यावरून ट्रम्प यांनी आम्ही युक्रेनला लोन, गॅरंटी दिली होती. आता युरोप आमचे पैसे परत आहे.

ट्रम्प यांनी असाच वाद ब्रिटीश पंतप्रधान किर स्टार्मर यांच्याशी देखील घातला होता. 27 फेब्रुवारीला स्टार्मर ट्रम्प यांच्या भेटीला व्हाईट हाऊसवर गेले होते. यावेळी किर यांनी, ट्रम्प आम्हाला रशियाविरोधात युद्धात मदत करतील का? असा सवाल केला होता. त्यावेळी ट्रम्प यांनी नाही म्हणत ब्रिटीश आपली सुरक्षा स्वत: करू शकतात, असे म्हटलं होतं. तसेच किर यांना उलट प्रश्न कर ते एकटेच रशियाशी युद्ध करणार आहेत का? असा प्रश्न केला होता. ज्यावर किर यांना गप्प राहावं लागलं होतं.

ट्रम्प यांच्या मनात काय?

गेल्या 38 दिवसात ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यासह पाच राष्ट्रप्रमुखांशी वाद घातला. यामुळे आता त्यांची नेमकी खेळी काय असा सवाल उठवला जातोय. यावरून JNUचे निवृत्त प्राध्यापक तथा विदेशी राजकीय तज्ज्ञ ए के पाशा यांनी 3 कारणे सांगितली आहेत. पाशा यांच्या मते ट्रम्प यांनी जगभरात आपली ओळख सुपरमॅन अशी बनवायची आहे. सध्या ट्रम्प यांचे व्यक्तिमत्व हे सुपरमॅन ओळखीच्या पुर्ण विरोधात आहे. ट्रम्प यांनी फक्त इज्राइलच्या राष्ट्रपतींसोबत योग्य व्यवहार आणि चर्चा केली. मात्र इतर गेलेल्या राष्ट्रध्यक्षांना ट्रम्प यांनी गप्प केले.

फक्त अमेरिकाचे हित महत्वाचे

ट्रम्प यांच्या वागण्यात सध्या अमेरिकेच्या हिताला सर्वोच्च स्थान दिसत आहे. त्यांना अमेरिकेला अधिक बळकट बनवायचे आहे. त्यासाठी सत्तेवर येताच त्यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन असा नारा दिला होता.

आपली इमेज तयार करणे

ट्रम्प यांनी आपण सत्तेत आल्यास बेकायदा येथे राहणाऱ्यांवर कारवाई करू असे आश्वासन दिले होते. त्या प्रमाणे त्यांनी भारतासह काही देशातील नागरिकांना हाता-पायात बेड्या ठोकत त्यांच्या देशात परत पाठवले होते. यामुळे त्याच्यावर टीका देखील झाली होती. पण त्यांना आपल्या लोकांसमोर आपली इमेज बनवायची आहे.

पण या वादाचा फटका बसणार का?

JNUचे निवृत्त प्राध्यापक तथा विदेशी राजकीय तज्ज्ञ ए के पाशा यांच्या मते ट्रम्प यांच्या या वर्तनाचा अमेरिकेला फटका बसण्याची शक्यता लांब लांब नाही. कारण अमेरिके डॉलरची किंमत आणि त्यांचे इतर देशांवर असणारे कर्ज प्रमाणापेक्षा अधिक झाले आहे. यामुळे कर्जबाजारी देशांना अमेरिका म्हणेल तेच ऐकावं लागणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या मनात काहीही असो त्यांची गोष्ट ही त्या देशांना मान्य करावीच लागेल. सध्या फक्त रशिया आणि चीनचाच अमेरिकेला विरोध असून इतर बऱ्यापैकी देश अमेरिकेच्या बाजूने आहेत. तसेच ब्रिटनचे हात दगडाखाली अडकले असून त्यांना नाटोमध्ये जाण्यासाठी अमेरिकेची मदत हवी असल्याने तेदेखील ट्रम्प यांना विरोध करण्याच्या मानसिकतेत नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT