मागील काही महिन्यांपासून बांग्लादेशचे अंतरिम सरकार सातत्याने भारताशी पंगा घेताना दिसत आहे. मग तो घुसखोरीचा मुद्दा असो वा हिंदूंवरील हल्ल्याचा. यापार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांग्लादेशला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने बांग्लादेशच्या आर्थिक नाड्या आवळणारा मोठा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विकास एजन्सीने (USAID) बांग्लादेशला देण्यात येणारी सर्व मदत व प्रकल्प थांबवण्याचे आदेश काढले आहे. या निर्णयामुळे बांग्लादेशला सर्वात मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेकडून सर्वच मदत थांबणार असल्याने देशातील विविध प्रकल्प तसेच योजना बंद पडणार आहेत. त्याचा मोठा फटका विकासालाही बसणार आहे.
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये बांग्लादेशची मदत थांबवण्याच्या निर्णयाचाही सावेश आहे. त्यावर USAID ने शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या वर्क ऑर्डर, कॉन्ट्रॅक्ट आणि खरेदी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
USAID कडून बांग्लादेशात आरोग्य, शिक्षण, कृषी आणि आर्थिक सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. आता या निर्णयांमुळे संबंधित क्षेत्रातील अनेक कामे ठप्प होण्याची शक्यता आहे. या आदेशाचे पत्र जारी करण्यात आले आहे. सर्व कामे तातडीने बंद करण्याचे निर्देश पत्रातून देण्यात आले आहेत.
ट्रम्प यांच्या सरकारने केवळ बांग्लादेशच नव्हे तर युक्रेनसह इतर काही देशांची मदतही थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये लष्करी मदतीचाही समावेश आहे. केवळ आपत्कालीन खाद्य व इतर सहाय्य सुरू राहणार आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या मदतीचे सरकारकडून पुनरावलोकन केले जाणार आहे. त्यानंतरच ही मदत पुन्हा सुरू ठेवायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.