
Delhi Vidhan Sabha Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरा झडत आहेत. अशातच दिल्ली निवडणुकीत आणखी नवा वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने अन्य राज्यातील पोलिस राजधानी दिल्लीत दाखल झाली आहे.
पंजाब पोलिसांनी बाहेर पाठवून गुजरातच्या पोलिसांना मोदी सरकारने दिल्लीत आणले आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर केला आहे.
दिल्लीत गुजरात पोलिस दाखल होताच नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिला आहे. केजरीवाल यांच्या आरोपांना शहांनी फेटाळले आहे. निवडणूक प्रक्रियेचा भाग असल्याने पोलिसांची अदला-बदली करण्यात आली असल्याचे शहांनी यांनी सांगितले.
भाजपने आज आपले तिसरे संकल्पपत्र जाहीर केले आहे. यात भाजपने यमुना नदीच्या स्वच्छतेबाबत आश्वासन दिले आहे. यावरुन काँग्रेसने राजकीय वातावरण तापवण्यास सुरवात केली आहे. खासदार राहुल गांधी यांची प्रकृती बिघडली असल्याने ते प्रचारात सध्या सक्रिय नाहीत.
दिल्लीत चांगले सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला संधी द्या, असे भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांनी म्हटलं आहे. दिल्लीचा विकास करण्यासाठी एकदा भाजपला संधी द्या, असे त्यांनी म्हटलं आहे. येथील जनतेचा अधिकार भाजपला मिळत आहे, अनेक विकासाच कामे दिल्लीत बाकी आहे, दिल्लीची जनतेला बदल हवा आहे, असे वर्मा यांनी सांगितले.
गुजरात पोलिस दिल्ली दाखल झाल्यानंतर गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सोशल मीडियावर केजरीवाल यांच्या समाचार घेतला आहे. केजरीवाल यांना जनता 'धोकेबाज' का म्हणते हे माझे आता लक्षात आहे. केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाचे नियम माहीत नाही का? असा सवाल संघवी यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.