Donald Trump announcing fresh tariffs on India, escalating US-India trade tensions. The move sparked backlash from Indian officials calling it “unjust” Sarkarnama
देश

Donald Trump Tariff Hike : "राष्ट्रीय हितासाठी..."; ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेताच भारतानेही स्पष्ट केली आपली भूमिका

Donald Trump 50% import duty India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून अनेक मनमानी आणि टोकाचे निर्णय घेत आहेत. त्यांच्या टॅरिफ धोरणाचा जगातील अनेक देशांना फटका बसत आहे. तरीही ते काही केल्या थांबायचं नाव घेत नसल्याचं दिसत आहे.

Jagdish Patil

Donald Trump Tariff Hike : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून अनेक मनमानी आणि टोकाचे निर्णय घेत आहेत. त्यांच्या टॅरिफ धोरणाचा जगातील अनेक देशांना फटका बसत आहे. तरीही ते काही केल्या थांबायचं नाव घेत नसल्याचं दिसत आहे.

अशातच त्यांनी मित्र राष्ट्र असलेल्या भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आणि ती अंमलात देखील आणली. त्यानंतरही शांत न बसता ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचं सांगत भारताकडून दंड वसूल करण्याचा इशारा दिला.

हा इशारा त्यांनी प्रत्यक्षात आणत आता भारतावर आणखी 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. त्यामुळे भारतावर एकूण 50 टक्के आयातशुल्क ट्रम्प यांच्याकडून लादण्यात आलं आहे. अमेरिकेचा हा निर्णय भारताला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्यानतंर भारताने आपली बाजू ठामपणे मांडली आहे. या सर्व प्रकरणावर भारताकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

ज्यामध्ये त्यांनी अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि अवास्तव असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "इतर अनेक देशांनी त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही कृती अन्यायकारक आणि अवास्तव असून भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल."

दरम्यान, ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अतिरिक्त आयातशुल्कामुळे अमेरिकेत भारतीय वस्तुंच्या किंमती महागणार आहेत. याचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर काही तोडगा निघणार की ट्रम्प आपला मनमानी कारभार सुरूच ठेवणार? असा प्रश्न भारतासह जगातील अनेक देशांना पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT