Donald Trump Additional Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बाॅम्ब, आता निर्यातीवर द्यावा लागणार 50 टक्के कर; एका फटक्यात टक्क्यांची 25 अतिरिक्त वाढ

USA Additional 25 percent Tariff on India : काही दिवासांपूर्वी अमेरिकेने भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला होता. आता पुन्हा यामध्ये वाढ करत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा झटका दिला आहे.
Former US President Donald Trump announces an additional 25% tariff on Indian imports, pushing total duties to 50%, sparking trade concerns.
Former US President Donald Trump announces an additional 25% tariff on Indian imports, pushing total duties to 50%, sparking trade concerns. Sarkarnama
Published on
Updated on

Tariff on India : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा धक्का दिला आहे. भारतावर ट्रम्प यांनी 25 टक्के टॅरिफ लावला होता. मात्र, यामध्ये आणखी 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तब्बल 50 टक्के कर हा भारतीय वस्तुंवर अमेरिकेत द्यावा लागणार आहे. या थेट परिणाम भारताच्या व्यापाऱ्यावर होण्याची शक्यता आहे.

भारत हा रशियाकडून तेल खरेदी करतो. ते तेल खरेदी थांबण्याचे इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला होता. जर खरेदी थांबवली नाही तर भारतावर अतिरिक्त कर लावू असे ट्रम्प यांनी म्हटले होते. आज (बुधवारी) ट्रम्प यांनी भारतवर अतिरिक्त 25 टक्के कर लावत असल्याची घोषणा केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोपी केला होता की, भारत फक्त रशियाकडून तेलच खरेदी करत नाही तर ते तेल खुल्या बाजारात विकून प्रचंड नफा कमवत आहे. भारत आणि रशियाच्या मैत्रीवर ट्रम्प यांनी टीका करत भारताची अर्थव्यवस्था मृतअवस्थेत असल्याची टीका देखील केली होती.

कधीपासून लागू?

भारतावर लादण्यात आलेल्या अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ कधीपासून लादण्यात येणार याची माहिती देखील अमेरिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आजपासून 21 दिवसानंतर या टॅरिफ अंमलबजावणी सुरू होणार आहे. तसेच अमेरिकेच्या प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, सध्या भारत सरकार थेट किंवा अप्रत्यक्षपणे रशियन फेडरेशनकडून तेल आयात करत असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे हा अतिरिक्त टॅरिफ लादण्यात आले आहे.

भारतावर किती परिणाम?

भारतीय तज्ज्ञांच्या मते अमेरिकेने भारताव लादलेल्या टॅरिफच्या भारतीय जीडीपीवर फारसा परिमाण होणार नाही. कारण भारतातून अमेरिकेत निर्याद होणाऱ्या मालाचे प्रमाण हे जीडीपीच्या केवळ दोन टक्क्यांच्या आसपास आहे. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे परिणाम झाला तरी त्याचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार नाही. भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीवर परिणाम होईल पण ती मंद होणार नाही.

Former US President Donald Trump announces an additional 25% tariff on Indian imports, pushing total duties to 50%, sparking trade concerns.
Local Body Election : दिवाळीनंतरची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कोणासाठी ठरणार फायदेशीर?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com