Donald Trump Iran threat, AI image Sarkarnama
देश

US Iran conflict : मोठी बातमी : काही तासांत इराणमध्ये हाहाकार? अमेरिका सर्वात मोठा विध्वंसक हल्ला करणार, जगाची धाकधूक वाढली...

Donald Trump Iran threat 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये वापरलेले शब्द अत्यंत आक्षेपार्ह आहेत. एखाद्या देशाविषयी अशाप्रकारे भाषा वापरत त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून संपूर्ण मर्यादा ओलांडल्याची चर्चा आहे.

Rajanand More

Iran attack warning : अमेरिकेकडून इराणला होर्मूझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी सातत्याने इशारा दिला जात आहे. मात्र, इराण झुकण्यास तयार नाही. त्यामुळे अमेरिकेसह इस्त्रायलकडून सातत्याने इराणवर हल्ले केले जात आहेत. काही तासांपूर्वीच इराणने अमेरिकेचे जेट विमान पाडले होते. त्यातील पायलटला वाचविण्यासाठी अमेरिकेला इराणमधून घुसून धाडसी मोहीम राबवावी लागली. त्यानंतर ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने जगातील अनेक देशांवर ऊर्जा संकट कोसळले आहे. इंधन व गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. आता ही मुदत संपत असून ट्रम्प यांनी आता इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या मंगळवारपर्यंत होर्मूझ मार्ग खुला न केल्यास इराणवर सर्वात मोठा विध्वंसक हल्ला करण्याची धमकी त्यांनी दिली आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, ‘मंगळवारी इराणमध्ये पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे होईल.’ याचा अर्थ स्पष्ट आहे की, अमेरिकेकडून मंगळवारी इराणमधील ऊर्जा प्रकल्प आणि प्रमुख पुलांवर हल्ला करण्याचा प्लॅन करण्यात आला आहे. होर्मूझ उघडा नाहीतर नरकात जाल. आता फक्त बघत राहा, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी पोस्टमध्ये वापरलेले शब्द अत्यंत आक्षेपार्ह आहेत. एखाद्या देशाविषयी अशाप्रकारे भाषा वापरत त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून संपूर्ण मर्यादा ओलांडल्याची चर्चा आहे. ट्रम्प पहिल्यांदाच एवढे हतबल झाल्याचे दिसून आले आहे. ते थेट शिवीगाळ करण्यापर्यंत पोहचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ट्रम्प यांचा नेमका प्लॅन काय?

इराणमधील प्रमुख पुल आणि ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यास संपूर्ण देशात हाहाकार माजेल. संपूर्ण देश अंधारात लोटला जाईल. पुल उद्धस्त केल्यास वाहतूकव्यवस्था कोलमडून जाईल. त्याचा दैनंदिन जनजीवनासह अत्यावश्यक सेवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. सर्वसामान्य नागरिकांचे हाल होऊ शकतात. ट्रम्प यांनीही यापूर्वी इशारा दिला होता. पण यावेळी त्यांनी आपले टार्गेट सांगत सतर्क केले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT