US vs Iran War : अमेरिकेची आतापर्यंतची सर्वात धाडसी मोहीम; इराणच्या जबड्यातून दोन पायलट सहीसलामत काढले बाहेर...

US pilots rescued mission : ऑपरेशनच्या शेवटच्या टप्प्यात संबंधित अधिकाऱ्याला घेऊन जाणाऱ्या विमानासह आणखी एक विमानात तांत्रिक बिघाड झाला. इराणमधीलच एका अमेरिकी बेसवर ही विमाने उतरविण्यात आली.
US pilots rescued mission
US pilots rescued missionSarkarnama
Published on
Updated on

US military operation : अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांना इराणही जशास तसे उत्तर देत आहे. त्यामुळे हे युध्द अधिकच भडकले आहे. इराणकडून शुक्रवारी अमेरिकेचे F-15E स्ट्राईक ईगल हे जेट विमान पाडण्यात आले होते. विमान अपघातग्रस्त होण्याआधीच पायलट आणि दुसरा सहकारी पॅराशुटच्या मदतीने बाहेर पडले होते. इराणसारख्या शत्रुच्या तावडीतून या दोघांना वाचविण्यासाठी अमेरिकेने लष्कराच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन राबविले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच सोशल मीडियात या मिशनची माहिती दिली आहे. शत्रुच्या भूमीवरून दोन पायलटला वाचविण्याची ही लष्कराच्या इतिहासातील पहिलीच वेळ होती, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. या मोहिमेसाठी जगातील सर्वाधिक अत्याधुनिक साधनांचा वापर केल्याची माहितीही ट्रम्प यांनी दिली.

इराणच्या तावडीतून दोघांना वाचविण्यासाठी अमेरिकेने शनिवारी ४८ तासांचे अत्यंत धाडसी ऑपरेशन राबविले. दोघांना वाटविण्यासाठी स्वतंत्र टीम होत्या. एका पायलटचा तातडीने बचाव करण्यात आला होता. पण इराणने पाडलेल्या जेट विमानातील वेपन्स सिस्टीम ऑफिसर इराणमध्ये अडकून पडला होता. त्याच्याकडे बचावासाठी केवळ एकच पिस्तूल होते. त्याआधारे तो शत्रुपासून बचावाचा प्रयत्न करत लपत होता. त्याला शोधण्यासाठी इराणी सैन्याने जेट विमान पडलेल्या भागाला घेराव घातला होता. स्थानिक लोकांना मदतीचे आवाहन केले. पण अपेक्षित मदत मिळाली नाही, त्यामुळे अधिकाऱ्याला लपण्याची संधी मिळाली होती.

US pilots rescued mission
Jagdeep Dhankhar news : जगदीप धनखड यांनी चक्रं फिरवली अन् भाजपचा पराभव? तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजकीय समीकरणं बदलली...

आपल्या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी अमेरिकेने एक धाडसी मिशन प्लॅन केले. त्यामध्ये शेकडो सैनिकांचा समावेश होता. त्याचप्रमाणे जवळपास डझनभर लढाऊ विमाने, हेलिकॉप्टरसह सायबर, स्पेस आणि इतर गुप्चचर यंत्रणांचा समावेश होता. सर्वच पातळीवर अमेरिकेचा या मिशनमध्ये कस लागणार होता. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला मारण्यासाठीही अमेरिकेने अशीच तयारी केली होती.

अमेरिकी अधिकाऱ्याकडे संपर्कासाठी एक कम्युनिकेशन डिव्हाईस होते. त्यामुळे बचाव पथकासोबत त्याचा संपर्क होत होता. विमानातून अमेरिकी कमांडो त्या परिसरात उतरले त्यावेळी मोठ्य प्रमाणात इराणकडून गोळीबार सुरू होता. विमानांतून इराणी सैन्यावर बॉम्ब टाकण्यात आले. त्यामुळे कमांडोंना संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्यात यश आले.

US pilots rescued mission
Dilip Walse Patil post : जशी 68 वर्षे जुनी गाडी आजही सक्षमपणे चालू राहू शकते, तसंच एखादी व्यक्ती..! वळसे पाटलांच्या ‘फियाट’ पोस्टची जोरदार चर्चा

ऑपरेशनच्या शेवटच्या टप्प्यात संबंधित अधिकाऱ्याला घेऊन जाणाऱ्या विमानासह आणखी एक विमानात तांत्रिक बिघाड झाला. इराणमधीलच एका अमेरिकी बेसवर ही विमाने उतरविण्यात आली. तिथून दुसऱ्या विमानांनी कमांडो रवाना झाले. त्याआधी बिघाड झालेली विमान इराणी सैन्याच्या हाती लागू नयेत म्हणून उडवून देण्यात आली. या ऑपरेशनमध्ये वाचविण्यात आलेल्या अधिकाऱ्या कुवेतमध्ये नेण्यात आले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे हे ऑपरेशन खूपच धाडसी होते, असा दावा अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. अनेक तांत्रिक अडचणींमुळे सर्वच यंत्रणांचा या ऑपरेशनमध्ये कस लागल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले. ऑपरेशन यशस्वी ठरल्याचा आनंदही अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आला.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com