U.S. President Donald Trump announces strict sanctions on Russia. Sarkarnama
देश

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर छुपा घाव? रशियन तेलाने आग भडकणार?

Donald Trump’s Double Attack on Russia: What It Means for Global Oil Trade : डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्याने रशियाची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने रशियाला कोंडीत पकडण्यासाठी विविध प्रकारे आर्थिक दबाव आणत आहेत. नुकतेच अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर कठोर निर्बंध लादले आहेत. या निर्णयामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता या बंदीमुळे भारतावर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतातील सरकारी तेल कंपन्या असलेल्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि मंगळुरू रिफायनरी या कंपन्या आपल्या रशियन तेल व्यापाराच्या दस्ताऐवजांचे परीक्षण करत आहेत. यामागचा उद्देश असा की, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे त्यांच्यावर कोणताही कायदेशीर किंवा आर्थिक परिणाम होऊ नये. तसेच निर्बंधानंतर भारताला रशियन तेल कंपन्यांकडून थेट पुरवठा होणार की नाही, याची खात्री करणे असा उद्देश आहे. भारतीय सरकारी कंपन्या प्रामुख्याने रशियाकडून तेल मध्यस्थ व्यापाऱ्यांमार्फत खरेदी करतात.

रशियाच्या अर्थव्यवस्थेची होणार कोंडी..

नव्या निर्बंधांचा सर्वाधिक फटका रशियाच्या तेल क्षेत्राला बसणार आहे. रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारत अव्वल आहेत. गेल्या वर्षभरात चीनने रशियाकडून 100 दशलक्ष टनांहून अधिक कच्चे तेल आयात केले, तर भारताने मागील नऊ महिन्यांत दररोज सरासरी 17 लाख बॅरल तेल विकत घेतले आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर भारत रशियन तेलाचा एक महत्त्वाचा खरेदीदार म्हणून पुढे आला आहे.

भारतावर काय परिणाम होईल.

ट्रम्प यांच्या निर्बंधानंतर भारतीय कंपन्यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु सरकार या निर्बंधांच्या जोखमींचे मूल्यांकन करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज थेट रशियन कंपनीकडून कच्चे तेल खरेदी करते, त्यामुळे रिलायन्सवर परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच सरकारी रिफायनऱ्या मध्यस्थ व्यापाऱ्यांमार्फत तेल खरेदी सुरू ठेवू शकतील, कारण हे व्यापारी प्रामुख्याने युरोपीय असून सध्याच्या अमेरिकन निर्बंधांच्या कक्षेबाहेर आहेत.

रिलायन्सने डिसेंबर 2024 मध्ये रोसनेफ्ट या रशियन तेल कंपनीसोबत 25 वर्षांचा दीर्घकालीन करार केला होता, त्या कराराअंतर्गत रिलायन्स दररोज 5 लाख बॅरल तेल आयात करणार आहे. अमेरिकन निर्बंधांमुळे आता या कराराचा पुनर्विचार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रोसनेफ्ट आणि लुकोइल या दोन कंपन्या मिळून दररोज सुमारे 31 लाख बॅरल तेलाची निर्यात करतात. केवळ रोसनेफ्टच रशियाच्या एकूण तेल उत्पादनाच्या जवळपास निम्मा भाग निर्यात करते. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता येऊ शकते.

भारतीय अर्थव्यवस्थेला बसू शकतो फटका..

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्बंधांमुळे रशियावर आर्थिक दबाव वाढणार आहे. परंतु त्याचा परिणाम रशियन तेलावर अवलंबून असणाऱ्या भारतासारख्या देशांवरही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. भारताने भविष्याच्या दृष्टीने पर्यायी पुरवठ्याचे पर्याय शोधणे गरजेचे आहे. अन्यथा जागतिक तेल बाजारातील चढउतारांचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT