Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump oath ceremony : डोनाल्ड ट्रम्प पहिल्याच दिवशी विक्रम करणार; 100 फायली तयार...

America President Latest Update US politics news Donald Trump presidency : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शपथविधी होणार आहे.

Rajanand More

Donald Trump Decisions : अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. जगभरात त्यांच्या शपथविधीची उत्सुकता लागून राहिली आहे. शपथ घेतल्यानंतर ते पहिला निर्णय कोणता घेणार, याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रामुख्याने अजून काही तास राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर असलेले ज्यो बायडेन यांचे काही निर्णय ट्रम्प यांच्याकडून फिरवले जाणार असल्याची चर्चा आहे.

शपथविधीआधी ट्रम्प यांनी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी तसे संकेत दिले आहे. व्हाईट हाऊसमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवरील शंभर फायली तयार असून शपथ घेतल्यानंतर ते या फायलींवर सही करू शकतात. यामध्ये निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली जाईल. एका मुलाखतीतही त्यांनी पहिल्याच दिवशी विक्रम करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते.

ट्रम्प यांचे सहकारी स्ट्रीफन मिलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प हे कार्यकारी आदेशांच्या माध्यमातून देशाची दक्षिण सीमा सील करणे, अमेरिकेत बेकायदेशीर घुसघोरी केलेल्यांना परत पाठवणे, महिलांच्या खेळांमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून तृतीयपंथियांना बंदी घालणे, विविध दरवाढीबाबतचे निर्णय़ असतील. तसेच 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकी संसदेवर हल्ला केलेल्या दोषींना माफीचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. हे सर्वजण ट्रम्प यांची समर्थक असल्याचे मानले जाते.

बायडेन यांचे काही महत्वाचे निर्णय ट्रम्प यांच्याकडून फिरवले जाऊ शकतात. त्यामध्ये पॅरिस क्लायमेट करार, जीवाश्व इंधन उत्पादनावर लागलेले प्रतिबंध हटवणे, तेल ड्रीलिंग यासंदर्भात निर्णयांचा समावेश आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

कधी घेणार शपथ?

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शपथविधी होणार आहे. यावेळी अमेरिकेत दुपारी 12 वाजले असतील. शपथ घेतल्यानंतर ते लगेच व्हाईट हाऊसमध्ये जाऊन पदाचा कार्यभार स्वीकारतील. या समारंभासाठी जगभरातील अनेक नेते, उद्योगपती उपस्थित राहणार असून हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT