Donald Trump Election Ban  Sarkarnama
देश

Donald Trump Election Ban : ट्रम्प यांच्या अडचणी संपेना; महिनाभरातच दुसरी मोठी कारवाई!

Chetan Zadpe

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. महिनाभराच्या आतच ट्रम्प यांना दुसरा धक्का बसला आहे. अमेरिकतील कोलोरॅडोनंतर राज्यानंतर आता मेन (Maine) राज्यानेही त्यांना आगामी 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरवले आहे. मेनच्या सर्वोच्च निवडणूक अधिकाऱ्यांनी काल गुरुवार (दि.28) डोनाल्ड ट्रम्प यांना पुढील वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी राज्याच्या प्रायमरी बॅलेटमधून अपात्र ठरवले. (Latest Marathi News)

मागे झालेल्या (6 जानेवारी 2021 रोजीचा हल्ला) यूएस कॅपिटलवरील हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या कथित सहभागामुळे, त्यांना इतर राज्यांमध्येही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. दहा दिवसांपूर्वीच कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांना अपात्र ठरवले होते.

मेनचे सेक्रेटरी ऑफ स्टेट शेना बेलोज हे डेमोक्रेटीक पक्षाचे समर्थक आहेत. शेना बेलोज यांनी असा निष्कर्ष काढला की, 'रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आघाडीवर असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी खोटे दावे करून, कॅपिटॉल हिलच्या हल्ल्याबाबत चिथावणी दिली. यामागे निवडणूक प्रक्रिया विस्कळीत करण्याचा त्यांचा उद्देश होतो.'

ट्रम्प यांच्यावर ही कारवाई अमेरिकन राज्यघटनेच्या बंडखोरीच्या कलमांतर्गत करण्यात आली आहे. "युनायटेड स्टेट्स राज्यघटना हे आमच्या सरकार व्यवस्थेच्या पायावर, त्याच्या गाभ्यावर हल्ला सहन करत नाही." याबाबत बेलोज यांनी आपला निर्णय 34 पानांमध्ये सादर केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमेरिकीय संविधानाच्या बंडखोर किंवा विद्रोहाच्या कलमाच्या तरतुदींनुसार ट्रम्प यांना अपात्र ठरवण्याची मागणी मेनमधील माजी खासदारांच्या गटाने केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यघटनेतील हे कलम कोणत्याही देश अन् सरकार विरोधातल्या कोणत्याही प्रकारच्या बंडखोरीमध्ये सहभागी असलेल्या, कुणालाही घटनात्मक पदाची शपथ घेण्यास मनाई करु शकते. या निर्णयाविरोधात ट्रम्प आता राज्याच्या सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू शकतात, अशी शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT