Rahul Gandhi, Amit Shah Sarkarnama
देश

Dr Babasaheb Ambedkar Row : आता देशभरात चळवळ उभी राहणार! शहांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक

Mallikarjun Kharge Rahul Gandhi Congress BJP Parliament Winter Session : राहुल गांधींनी भाजप खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जात आहे. त्याला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.

Rajanand More

New Delhi : संसदेच्या आवारात गुरूवारी घडलेल्या घटनांमुळे सत्ताधाऱी भाजप आणि काँग्रेस पक्षाचे नेते अधिकच आक्रमक झाले आहे. एकमेकांवर धक्काबुक्कीचे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजपने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची पोलिसांत तक्रार केली आहे. पण त्यानंतर काँग्रेस अधिकच आक्रमक पवित्रा घेत आता देशभरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात चळवळ उभी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

संसदेच्या आवारातील घटनेत भाजपचे दोन खासदार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर भाजपच्याच एका महिला खासदाराने राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. दिवसभराच्या या घडामोडींनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि आरएसएसचे विचार संविधानविरोधी आणि आंबेडकरविरोधी आहे. गृहमंत्र्यांनी सगळ्यांसमोर त्यांची मानसिकता दाखवून दिली. त्यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावी, अशी आमची मागणी आहे. आज त्यांनी पुन्हा यावरून लक्ष विचलित करण्यासाठी नवीन मुद्दा काढला. संसदेच्या पायऱ्यांवर भाजपचे खासदार हातात काठ्या घेऊन उभे राहिले आणि आम्हाला अडवले.

नरेंद्र मोदींचे मित्र अदानींविरोधात अमेरिकेत केस आहे. अदानींना मोदी हिंदूस्तान विकत आहेत, हा मुख्य मुद्दा असून त्यापासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप राहुल यांनी यावेळी केला. मल्लिकार्जून खर्गे यांनीही शाह यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली. तसेच त्याविरोधात आता देशभरात चळवळ उभी राहील, असे स्पष्ट केले.

खर्गे यांनी सांगितले की, संसद चालवण्याचा संकल्प करत आम्ही 14 दिवसांपासून बाहेर आंदोलन करत आहोत. आम्ही अदानीच्या मुद्यावरून हल्ला चढवत होतो. पण संविधानाची चर्चा आली तेव्हा शहांनी आंबेडकरांची खिल्ली उडवली. ही मानसिकता जर एखाद्या पक्षाची, नेत्याची आहे तर ते निंदनीय आहे. आम्ही हा मुद्दा जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी पक्षाचे सर्व खासदारांनी मिळून संसदेत आवाज उठवला.

संपूर्ण देशात आंदोलन होत आहे. आज संसदेच्या आवारात आंबडेकरांच्या पुतळ्यापासून आंदोलनाला सुरूवात केली. एका रांगेत आम्ही निघालो होतो. पण त्यांना काय सुचले माहिती नाही, त्यांनी मकर दरवाजासमोर आम्हाला रोखण्यासाठी ते थांबले. आम्हाला आत जायचे होते. त्यांचे खूप पुरूष खासदार होते. शांततेत जाणाऱ्या महिला खासदारांनाही रोखले. मलाही त्यांना धक्का दिला. आता आमच्यावरच आरोप करत आहेत. आम्ही त्यांना धक्काबुक्की केली नाही, असे खर्गेंनी स्पष्ट केले.

भाजपने असे वातावरण तयार करून ठेवले असून आम्ही हे सहन करणार आहे. संपूर्ण देशात ही चळवळ उभी राहील. शांततापूर्ण पध्दतीने संसदेचे काम चालले होते, ती शांतता भंग करण्याचे काम त्यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT