Rahul Gandhi : महिला खासदार सभापतींसमोर रडल्या, राहुल गांधींवर गंभीर आरोप; म्हणाल्या, मी ‘अनकम्फर्टेबल’ झाले...

BJP Rajya Sabha MP Phangnon Konyak Jagdeep Dhankhar : संसदेच्या आवारात काँग्रेस आणि भाजप खासदार आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
Phangnon Konyak, Rahul Gandhi
Phangnon Konyak, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या दोन खासदारांनी धक्काबुक्कीचा आरोप केला आहे. या दोन्ही खासदारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातच राहुल यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाजपच्याच एका महिला खासदाराने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यसभेच्या उपसभापतींसमोर याबाबत तक्रार करताना त्या रडल्याचेही समोर आले आहे.

नागालँडमधील भाजपच्या खासदार फांगनोन यांनी राहुल गांधीची तक्रार राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याकडे केली आहे. राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाल्यानंतर फांगनोन यांनी सभागृहात याबाबत माहिती देत तीव्र नाराजी व्यक्त केली. धनखड यांनीही फांगनोन यांनी आपल्याकडे तक्रार आल्याचे सांगितले.

Phangnon Konyak, Rahul Gandhi
Arvind Kejriwal : आंबेडकर वादात केजरीवालांचा नवा डाव; आता नितीश कुमार, चंद्राबाबू काय करणार?

फांगनोन कोन्याक यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की, मी राज्यसभेच्या सभापतींना भेटले आहे. मी माझ्या सुरक्षेची मागणी करते. आता माझे मन खूप दुखी आहे. आज संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना राहुल गांधी माझ्या अत्यंत जवळ येऊन उभे राहिले. त्यामुळे मी अनकम्फर्टेबल झाले होते. राहुल गांधी माझ्यावर ओरडलेही.

एका महिला खासदारांवर अशाप्रकारे ओरडणे राहुल गांधींना शोभा देत नाही. मी खूप दुखी असून मला सुरक्षा हवी आहे. मी अनुसूचित जमातीतील असून राहुल यांची ही वागणूक योग्य नव्हती, असे कोन्याक यांनी राज्यसभेत सांगितले. सभागृहात धनखड यांनीही कोन्याक या माझ्याकडे रडत आल्याचे सांगितले. माझ्याकडे त्यांनी लेखी तक्रार दिली आहे. त्यांना मोठा धक्का बसला आहे. मी या प्रकरणात लक्ष घातले असल्याचे धनखड यांनी स्पष्ट केले.

Phangnon Konyak, Rahul Gandhi
Dr Babasaheb Ambedkar Row : संसदेच्या आवारात घमासान; भाजप खासदार ICU मध्ये; केंद्रीय मंत्री रुग्णालयात पोहचले

दरम्यान, कोन्याक यांनी राहुल गांधींची तक्रार केल्यानंतर लगेचच सभागृहात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी जोरदार प्रहार केला. राहुल गांधी यांनी लोकशाही विरोधी कृती करत आमच्या खासदारांसोबत धक्काबुक्की केली आहे. आमचे दोन खासदार जखमी झाले आहेत. भाजपच्या महिला खासदारांनाही राहुल गांधींनी धक्का दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com