Manmohan Singh SARKARNAMA
देश

Manmohan Singh : मनमोहन सिंग यांची 'ती' इच्छा आता कधीच पूर्ण होणार नाही..., आयुष्यभर राहिलेली खंत मृत्यूनंतरही कायम

Dr. Manmohan Singh Passes Away : भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर (27 डिसेंबर) देशभरात आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर देशभरात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

Jagdish Patil

Manmohan Singh Dead News: भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर (27 डिसेंबर) देशभरात आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर देशभरात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

मननोहन सिंग यांची जागतिक स्तरावर अर्थतज्ज्ञ म्हणून ओळख होती. त्यांच् निधनाची बातमी समोर येताच देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी यांनी मनमोहन सिंगयांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. दरम्यान, आता सिंग यांच्या एका अंतिम इच्छेची चर्चा सुरू झाली आहे.

शिवाय त्यांची ती अंतिम इच्छा कधीच पूर्ण न केल्याची खंत त्यांना शेवटपर्यंत होती. तर सिंग यांना शेवटपर्यंत पूर्ण करता आलेली इच्छा नेमकी कोणती होती ते जाणून घेऊया. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचा 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात जन्म झाला होता. या काळात भारत पाकिस्तान फाळणीच्या वेदना त्यांना सहन कराव्या लागल्या.

आपल्या जीवाभावाची माणसं आणि हक्काची जमीन मालमत्ता सोडून त्यांना सर्व सोडून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्याला जावं लागलं. मात्र, त्यांनी तिथल्या मातीची, माणसांच्या आठवणींचा ठेवा फक्त ते आपल्यासोबत घेऊन आले.

तर काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी एका मुलाखतीत मनमोहन सिंग यांच्या अखेरच्या इच्छेचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं, परदेशात नोकरी करत असताना मनमोहन सिंग हे त्यांच्या पाकिस्तानातील मित्रांसह रावळपिंडी या शहरात गेले होते. यावेळी ते तेथील गुरुद्वारात देखील गेले. बैसाखी सणाला ते या ठिकाणी येत असत.

पण तिथूनच जवळ असलेल्या त्यांच्या गावी जाण्याची इच्छा असतानाही त्यांनी तिथं जाता आलं नाही, असं त्यांनी सांगितलं. मनमोहन सिंग लहान असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं होतं. आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या आजीनेच त्याचं पालनपोषण केलं. फाळणीपूर्व झालेल्या दंगलीत त्यांच्या आजीचीही हत्या झाली.

या घटनेमुळे त्यांच्या मनावर मोठा आघात झाला होता. आजीच्या हत्येनंतर ते पेशावर येथे वडीलांच्या घरी आले. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान त्यांना माध्यमिक शाळा सोडून भारतात यावं लागलं होतं. तेव्हापासून सिंग यांची त्यांच्या मूळ गावी जाण्याची इच्छा आता कायमची अपूर्णच राहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT