Manmohan Singh News : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला. सामान्य कुटुंबातून आलेल्या मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर पंतप्रधान पद मिळवले. ते हाडाचे राजकारण नव्हते. मात्र, मुल्यांवर आधारित राजकारण झाले पाहिजे म्हणून ते कायम आग्रही राहिले. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्यातील मुल्याधिष्ठीत राजकारणी दिसून येतो.
लोकसभेत भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे अस्वस्थ होते. काँग्रेस नेत्यांशी बोलून त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश देखील निश्चित झाला होता. मुंडेंच्या पक्ष प्रवेशाची संपूर्ण तयारी देखील झाली होती. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत महाराष्ट्रातील भाजपचे काही आमदार देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग होते. त्यांना या पक्षप्रवेशाविषयी काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले.
शांत संयमी मनमोहन सिंग यांना भाजपचा उपनेता आपल्या पक्षात प्रवेश करतोय हे समजल्यानंतर त्यांनी त्याला विरोध केला. मी पंतप्रधान असताना, लोकसभेमधील भाजपच्या उपनेत्याला पक्षप्रवेश दिलेला मला चालणार नाही. अशा पद्धतीने पक्ष फोडायचा नसतो, असे ठणकावून सांगून गोपीनाथ मुंडेंचा पक्षप्रवेश रोखला.
मनमोहन सिंग यांची दुसऱ्यांदा 2009 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांच्या दुसऱ्या काळाच्या सुरुवाती पासून विविध आंदोलनांमुळे त्यांच्या सरकारच्या अडचणी वाढत गेल्या. अन्ना हजारे यांचे आंदोलन, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा यांमुळे युपीए सरकारवर टीका करण्यात येत होती.
2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते केवळ रबरस्टॅप पंतप्रधान असल्याची टीका केली होती. या सर्व टीकांना मनमोहन सिंग संयतपणे सामोरे गेले. इतिहास मला न्याय देईल, असे ते आपल्या सर्व टीकाकारांना म्हटले होते.
मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना जगावर मंदीचे सावट होते. मात्र, त्यांनी मंदीच्या सावटामध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्थ स्थिर ठेवली. जागतिक मंदीचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला नाही. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी मनमोहन सिंग यांचे जाहीर कौतुक करत अर्थसंकटाच्या काळात आपण मनमोहन सिंग यांचा सल्ला घेत असल्याचे सांगितले.
मनमोहन सिंग हे सलग दोनदा पंतप्रधान झाले. त्यांची संसदीय कार्यकीर्द तब्बल 33 वर्षांची होती. मात्र, ते लोकसभेवर निवडून कधीच गेले नाही. निवडणुकीच्या मैदाना उतरण्यापेक्षा त्यांनी राज्यसभेवर जाणे पसंत केले. तब्बल 33 वर्ष ते राज्यसभेचे सदस्य होते. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते, अर्थमंत्री, पंतप्रधान अशी पदे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये भूषवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.