Gaya Railway Junction
Gaya Railway Junction Sarkarnama
देश

Railway: रेल्वे भरतीवरून विद्यार्थ्यांनी पेटवली ट्रेन; पोलिसांवरही दगडफेक

सरकारनामा ब्यूरो

गया : रेल्वे भरती (Railway Exam) बोर्डाने ग्रुप डी आणि एनटीपीसीच्या (NDPC) परीक्षा पुढे ढकलल्याने बिहारमध्ये चांगलीच परिस्थिती चिघळली आहे. रेल्वे परीक्षेतील कथित गैरप्रकार व परिक्षा आणि निकालासंदर्भात वेळेवर माहिती मिळत नसल्याचा राग परिक्षार्थीच्या मनात असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी गया जंक्शन (Gaya Railway Junction) येथे गोंधळ घातला व येथे उभी असलेल्या एका रिकाम्या ट्रेनला पेटवले आहे. (gaya Railway junction voilance) दरम्यान, रेल्वे पोलीस (RPF) आणि विद्यार्थ्यांमध्ये जोरदार दगडफेकही झाल्याची माहिती मिळाली आहे. गया जंक्शन येथे हजारो विद्यार्थी जमले होते. येथील हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरपीएफने अश्रुधुराचा वापर केला असून आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी गया येथे पेटवलेल्या रेल्वेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान त्वरित बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले व ट्रेनमध्ये लावण्यात आलेली आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निदर्शकांनी रिकाम्या ट्रेनच्या बोगीला आग लावल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व सुरू असतांना संतप्त विद्यार्थ्यांनी दुसरी बोगीही पेटवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान आरपीएफने एका आंदोलकाला घटनास्थळावरून पकडले आहे. हा पकडण्यात आलेला आरोपी विद्यार्थी उमेदवार असल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गया येथील घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आहे. येथे काही लोकांनी ट्रेनला आग लावली असून त्यापैकी काहींची ओळख समोर आल्याची माहिती गयाचे पोलीस अधीक्षक (SP) आदित्य कुमार यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नये. तसेच रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करू नये. या प्रकरणी सरकारने समिती नेमली आहे, असे आवाहनही कुमार यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT