टीपू सुलतान'च्या नावावरुन राजकारण पेटले; शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने

टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) नावावरून मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे.
Ram Kadam
Ram Kadam
Published on
Updated on

मुंबई : टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) नावावरून मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड येथील एका क्रीडांगणाला टीपू सुलतान नाव दिल्यामुळे भाजप (BJP)-शिवसेना (Shivsena) आमने सामने आले आहेत. काँग्रेस (Congress) नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन होणार आहे. मात्र टिपू सुलतान मैदानाच्या नावाने बॅनर लावण्यात आल्याने त्यावर राजकारण तापले आहे.

त्यानंतर आता भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी थेट शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या मैदानाला टीपू सुलतानाचे नाव नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या. जर राज्य सरकारने त्या मैदानाचे नाव बदलले नाही तर आम्ही स्वत तेथे शिवरायांच्या नावाचा बोर्ड घेऊन जाऊ आणि लावू, जर आम्हाला हा बोर्ड लावू दिला नाही तर आम्ही रस्त्त्यावर उतरु, छत्रपतींच्या भूमीत आम्ही असलं खपवून घेणार नाही, असा इशारा राम कदम यांनी दिला आहे.

Ram Kadam
जयंत पाटलांनी सांगितले नगरपंचायत निवडणूकीतील पराभवाचे कारण

दरम्यान भाजपसह विहिंपनेही या मैदानाला टीपू सुलतानाचे नाव देण्यास जोरदार विरोध सुरू केला आहे.तर शिवसेनेने हिंदुत्वापासून पळ काढण्यासाठी आणि सत्तेसाठी मौन बाळगल्याचा आरोप भाजपने केला, या मुद्द्यावरून शिवसेना नेत्यांची वेगवेगळी वक्तव्येही समोर आली आहे. तर मैदानाचे नाव आधीपासूनच टिपू सुलतान होते, मग आता त्यावरुन राजकारण कशाला, असा सवाल कॉंग्रेसने केला आहे.

मात्र दूसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय युद्ध सुरू झाले आहे. अशा स्थितीत मुंबईतील एका मैदानाला टीपू सुलतानाचे नाव देऊन त्याचे उद् घाटन करण्याच्या मुद्द्यावारिन शिवसेना -भाजप आमने-सामने आले आहेत. शिवसेना हिंदुत्वाचे ज्ञान देते, मात्र त्यांच्या नाकासमोर काँग्रेसचे मंत्री मुंबईतील एका मैदानाला टिपू सुलतानचे नाव देत आहेत. पण उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी मौन पाळले आहे, असा आरोप भाजपने केला आहे.तर भाजपप्रमाणेच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानेही टिपू सुलतानच्या नावाला विरोध सुरू केला आहे.

दरम्यान कॉंग्रेस मंत्री अस्लम शेख हे देखील मालाड भागातील आहेत. आज (२६ जानेवारी) सायंकाळी ५ वाजता ते टिपू सुलतानच्या नावाने या मैदानाचे उद्घाटन करणार आहेत. काँग्रेसचा हा कार्यक्रम शिवसेनेसाठी अडचणीचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे एकीकडे भाजपचा विरोध असताना दूसरीकडे टिपू सुलतानच्या नावाचा निषेध करण्यासाठी कट्टर शिवसैनिकही रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचे बडे नेतेही गोंधळात पडले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com