EC Commissiner Sarkarnama
देश

EC Commissiner Rajiv Kumar : 'वफा खुद से नही, खता ईव्हीएमपर...; कवी मनाच्या निवडणूक आयुक्तांचा 'शायराना अंदाज...

Chetan Zadpe

Delhi News : देशातील लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. देशभरात एकूण सात टप्प्यांत निवडणुका होणार असल्याचं निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून, 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. (Latest Marathi News)

आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा अनोखा अंदाज देशातील जनतेला पाहायला मिळाला. पत्रकार परिषदेत बोलताना राजीव कुमार यांनी अनेक शेर-शायरींमधून आपल्या भावना व्यक्त केला. कुमार यांचा शायराना अंदाज पाहून उपस्थितांनी टाळ्यांची दाददेखील दिली. (Lok Sabha Election)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजीव कुमार यांनी राजकीय पक्षांना एकमेकांवरील वैयक्तिक हल्ले टाळण्याची आणि प्रचारादरम्यान शिष्टाचार राखण्याची विनंती केली. या वेळी ते म्हणाले, निवडणुकात विविध पक्षांच्या आणि नेत्यांमधील स्पर्धा निकोप राहावी, या अनुषंगाने त्यांनी उर्दूचे शायर बशीर बद्र यांच्या एका शेरचा आधार घेतला. कुमार म्हणाले,

"दुश्मनी जम कर करो, लेकिन ये गुंजाइश रहे

जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों..."

राजीव कुमार म्हणाले, आजकाल खूप लवकर मित्र आणि शत्रू होण्याचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी इतकेही अयोग्य आणि असंसदीय आरोप एकमेकांवर करू नयेत की, ते एकमेकांचे शत्रू बनतील. या वेळी राजीव कुमार यांनी रहीम यांच्या दोह्याचा आधार घेतला. आयुक्तांनी सांगितले की, आपल्या वाणीतून जे काही बाहेर पडते ते आजच्या काळात कायमस्वरूपी रेकॉर्ड होते आणि ते पुन्हा-पुन्हा ते पाहिले जाते. त्यामुळे कृपया वाईट शब्दांचा वापर करू नका. वाईट आठवणी निर्माण करणे टाळा कारण एकदा भांडण झाले की प्रेमाचा धागा तुटतो, हे सांगण्यासाठी त्यांनी पुढील दोहा सांगितला.

'रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो छिटकाय,

टूटे से फिर न मिले, मिले गाँठ परिजाय.'

आजच्या पत्रकार परिषदेच्या आपल्या संबोधनाच्या शेवटी राजीव कुमार यांनी ईव्हीएमबद्दल (EVM) आपले मत व्यक्त केले. ईव्हीएमवर (EVM) शंका घेणाऱ्यांना त्यांनी शायरीतून जबरदस्त प्रत्युत्तर दिले. एक शेर त्यांनी ऐकवला.

ते म्हणाले,

'अधूरी हसरतों का इल्जाम हर बार... हम पर लगाना ठीक नहीं,

वफा खुद से नहीं होती.. खता ईव्हीएम की कहते हो!'

या शेरच्या माध्यमातून त्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावल्याचं पाहायला मिळत आहे.

'कोणाही अफवा पसरवू नये -

'झूठ के बाजार में रौनक तो बहुत है,

गोला बुलबुले जैसा तुरंत ही फट जाता हैं,

पकड़ भी लोगे तो क्या हासिल होगा,

बस सिवाय धोखे के!'

सोशल मीडियावर पसरवणाऱ्या खोट्या बातम्यांविरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांनी मतदारांना आवाहन केले. राजीव कुमार (Rajiv Kumar) म्हणाले, "प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. आपल्यावर टीकाही होऊ शकते. मात्र, अफवा पसरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. या वेळी निवडणूक आयोग अफवा रोखण्यासाठी कडक भूमिका घेणार आहे. सोशल मीडिया पोस्ट काढून टाकण्यासाठी अधिकारी तैनात केले जातील. आमची संपूर्ण यंत्रणा फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी काम करेल."

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT