Kolhapur Lok Sabha Election 2024 : "शाहू महाराजांना निवडणुकीला उभे करण्यामागे शरद पवारांचे षडयंत्र"

Shahu Chhatrapati Vs Sanjay Mandlik : कोल्हापुरातील लोकसभेच्या मैदानात शाहू महाराज छत्रपती आणि संजय मंडलिक यांच्यात लढत होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
sharad pawar shahu maharaj chhatrapati
sharad pawar shahu maharaj chhatrapatisarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : 16 मार्च | शरद पवार ( Sharad Pawar ) हे देशाचे मोठे नेते आहेत. त्या काळात पवारांच्या विरोधात सदाशिवराव मंडलिक होते. तेवढा मोठा मी नाही. शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांना निवडणुकीला उभे करण्याचे षडयंत्र त्यांचेच आहे. शाहू महाराज यांची निवडणुकीची इच्छा होती का नाही, हे मला माहिती नाही. पण, शरद पवारांना जुना कोणता तरी राग काढायचा असेल का? याबाबत कल्पना नाही. जर रागच काढायचा असेल, तर जनता दाखवून देईल, अशा शब्दांत कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आज शनिवारी ( 16 मार्च ) कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

sharad pawar shahu maharaj chhatrapati
Sambhaji Raje News: लोकसभेच्या धामधुमीत संभाजीराजेंची वेगळीच चर्चा; लवकरच नव्या भूमिकेत

"रविवारी ( 17 मार्च ) दुपारपर्यंत महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. उमेदवार म्हणून मी रिंगणात उतरणार आहे. निवडणुकीची तयारी म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मेळावा घेतला. माझ्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्ते कामाला लागतील. माझी उमेदवारी घोषित नसल्याने मी शुक्रवारच्या मेळाव्याला उपस्थित नव्हतो. उमेदवारी घोषित झाल्यानंतर महायुतीतील सर्व नेत्यांना घेऊन मी मेळावा घेणार आहे," असं मंडलिकांनी ( Sanjay Mandlik ) स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"उमेदवारीवरून वावड्या, मी गैर समजत नाही"

महायुतीच्या उमेदवाराबाबत कोल्हापुरात अजूनही संभ्रम आहे. त्यावर बोलताना मंडलिक म्हणाले, "युतीतल्या प्रत्येक पक्षाला वाटते की माझ्या विचाराचा माणूस या शाहूंच्या भूमीतून निवडून यावा. जर उमेदवारीवरून वावड्या उठल्या तरी मी गैर समजत नाही. निवडणुकीच्या काळात हे होतच असते. खासबाग मैदानात एखाद्या पैलवानाची कुस्ती असेल, तर त्याला सराव देण्यासाठी तालमीतील सर्व पैलवान आखाड्यात उतरत असतात. त्याच पद्धतीने या वावड्या म्हणजे सरावाच्या कुस्त्या आहेत."

"लोकसभा निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी"

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्याबद्दल बोलण्यास नकार दिला होता. 'मी कोणाच्याही विरोधात बोलणार नाही. पण, माझ्या स्टेजवर कोण येईल, हे सांगता येत नाही,' असं विधान सतेज पाटलांनी केलं होतं. त्यावर मंडलिकांनी म्हटलं, "मागील निवडणुकीत पाटील माझ्या स्टेजवर होते. या निवडणुकीला ते माझ्या स्टेजवर येतील असं मी का म्हणू नये? ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणार आहे. व्यक्तिगत हेव्या-दाव्यावर ही निवडणूक जाऊ नये."

sharad pawar shahu maharaj chhatrapati
Lok Sabha Election 2024 : महाडिकांनी वाढवलं मंडलिकांचं टेन्शन; कोल्हापूरच्या आखाड्यात भाजप-सेनेची कुस्ती

"प्रकाश आबिटकर दुसरीकडे जाणार नाहीत"

आमदार प्रकाश आबिटकर ठाकरे गटाकडे परतणार असल्याचा दावा वकील असीम सरोदे यांनी केला होता. यावर मंडलिक म्हणाले, "सरोदे हे ज्योतिषी आहेत का? आमदार आबिटकर हे विकासासाठी झटणारे आहेत. ते निश्चितच आमच्याबरोबर असतील. दुसरीकडे जाण्याचा विचार आमदार आबिटकर करणार नाहीत."


( Edited By : Akshay Sabale )

R

sharad pawar shahu maharaj chhatrapati
Loksabha Election 2024 : शिंदे गटातील कोल्हापूरच्या दोन खासदारांचा उमेदवारीसाठी आटापिटा....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com