लखनौ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीआधी (UP Election 2022) राजकीय हालचालींना वेग आला आहे. सक्तवसुली संचालनालयाचे (ED) माजी सहसंचालक राजेश्वरसिंह (Rajeshwar Singh) यांना भाजपने (BJP) तिकीट दिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर 24 तासांतच भाजपने त्यांना मैदानात उतरवले आहे.
भाजपने लखनौमधील हायप्रोफाईल अशा नऊ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी बराच खल झाल्यानंतर जाहीर केली आहे. मागील वेळी लखनौमधील नऊपैकी आठ मतदारसंघ भाजपने जिंकले होते. यामुळे लखनौवर भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. लखनौमधील सरोजिनीनगर मतदारसंघातून राजेश्वरसिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. सिंह यांच्या स्वेच्छानिवृत्तीवर सरकारने शिक्कामोर्तब केल्यानंतर 24 तासांतच त्यांना उमेदवारी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सिंह हे उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. राजकीय इनिंगबद्दल बोलताना सिंह म्हणाले की. मला चांगल्या प्रशासनात योगदान द्यायचे आहे. याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरू केलेल्या चौकशांमध्येही सहभाग घ्यायचा आहे. माफियांच्या विरोधात ते अतिशय चांगले काम करीत आहेत. आपण सर्वांनीच त्यांना पाठिंबा द्यायला हवा. याचबरोबर वाढते धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठीही आपण प्रयत्न करायला हवेत.
उत्तर प्रदेशातील प्रचाराला जोर चढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व अन्य नेते विविध मार्गांनी राज्यात तुफानी प्रचार सुरू केला आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशमध्ये काही भाजपच्या मंत्री व आमदारांनी भाजपला रामराम केल्यामुळे बरीच खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराची मुख्य सूत्रे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याऐवजी मोदी व शहांकडे गेली आहेत. भाजप तीनशेच्या वर जागा नक्की मिळवणार असा विश्वास पक्षाच्या दिल्ली वर्तुळातून व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.