वानखेडेंमुळे मलिक अडचणीत; अॅट्रोसिटी दाखल करण्याचा मुंबई पोलिसांना आदेश

समीर वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
Nawab Malik and Sameer Wankhede
Nawab Malik and Sameer WankhedeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हा आरोप केला होता. या प्रकरणात वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली होती. यावर आयोगाने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मलिक यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. (Nawab Malik News Updates)

आपला छळ होत असल्याची तक्रार वानखेडेंनी आयोगाकडे केली होती. यावर आयोगाने मुंबई पोलिसांना आदेश काढला आहे. मलिक यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, असा आदेश आयोगाने दिला आहे. हा गुन्हा सात दिवसांच्या आत दाखल करावा, अशी तंबीही आयोगाने मुंबई पोेलिसांना दिली आहे. यामुळे वानखेडे प्रकरणात मलिक अडचणीत आल्याचे मानले जात आहे. याचबरोबर जात पडताळणी समितीने वानखेडे प्रकरणी 7 मार्चपर्यंत आयोगासमोर अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

Nawab Malik and Sameer Wankhede
मुलाच्या तिकिटासाठी खासदारकीवर पाणी सोडण्याची तयारी दाखवूनही पक्षानं डावललं

समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ गेल्या वर्षी 31 डिसेंबरला संपला आहे. वानखेडे यांनी कार्यकाळ वाढवण्यासाठी अर्ज केलेला नव्हता. तसेच, मुदतवाढीबाबत मुख्य कार्यालयातूनही त्यांना काहीही सांगण्यात आलेले नव्हते. वानखेडे यांना ऑगस्टमध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. मागील काही दिवसांत झालेल्या वादामुळे नंतर त्यांना मुदतवाढ मिळालेली नव्हती. अखेर एनसीबीने वानखेडेंना त्यांच्या मूळ सेवेत पाठवण्याचा आदेश काढला होता.

Nawab Malik and Sameer Wankhede
भाजपकडून गाजावाजा करीत मुलायमसिंहांच्या सूनबाईंना प्रवेश पण ऐनवेळी पत्ता कट

वानखेडे हे आयआरएसच्या सीमा शुल्क व अप्रत्यक्ष कर शाखेचे अधिकारी आहेत. ते पुन्हा याच शाखेत रुजू झाले आहेत. या शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या महसुली गुप्तचर संचालनालयात वानखेडेंना नियुक्ती देण्यात आली आहे. मुंबई एनसीबीमध्ये दाखल होण्याआधी ते याच विभागात होते. आता पुन्हा एकदा त्याच विभागात रूजू झाले आहेत. आर्यन खान प्रकरणात वानखेडेंवर गंभीर आरोप झाले होते. यानंतर त्यांच्याकडून आर्यन खानसह इतर हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास एनसीबीने काढून घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com