Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : EDच्या पाचव्या नोटीसीचं केजरीवाल काय करणार?

Avinash Chandane

Delhi Political News :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून आणखी एक समन्स आले आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने हे समन्स पाठवले असून, या नोटीसीला केजरीवाल सामोरे जाणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

आम आदमी पार्टीचे (Aam Aadami Party) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासाठी ईडीचे हे पाचवे समन्स आहे. यापूर्वीच्या सर्व नोटीसांकडे केजरीवालांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आता काय करणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दिल्लीतील मद्य धोरण 2021-22 कथिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने (CBI) यापूर्वीच दिल्ली सरकारमधील मंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. त्यानंतर ईडीने (ED) केजरीवालांची चौकशी करण्यासाठी त्यांना अनेक समन्स पाठवले. पण प्रत्येक वेळी ईडीचे समन्स बेकायदा आहेत, असा दावा करत केजरीवालांनी चौकशी टाळली.

आज ईडीने त्यांना पाचवे समन्स पाठवले असून 2 फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावले आहे. या संदर्भात केजरीवाल यांना पाठवलेल्या समन्सचा लीगल टीम अभ्यास करत असून त्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती 'आप'च्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीचे मद्य धोरण मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याने सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणा यात तपास करत आहेत. हे मद्य धोरण तत्कालीन नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी रद्द केले याणि याची सीबीआयकडून चौकशीची मागणी केली. ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर यात सीबीआयची एन्ट्री झाली होती.

यापूर्वी अरविंद केजरीवाल यांना गेल्यावर्षी 2 नोव्हेंबर आणि 21 डिसेंबर तसेच यंदा 3 जानेवारी आणि 18 जानेवारी रोजी ईडीने समन्स पाठवले होते. आता आजच्या पाचव्या समन्सला केजरीवाल काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT