Rahul Gandhi : बिहारमधील चेंगराचेंगरी आणि प. बंगालमधील दगडफेकीतून वाचले राहुल गांधी

Bharat Jodo Nyay Yatra : कटिहारामध्ये भारत जोडो न्याय यात्रेत चेंगराचेंगरी, प. बंगालमध्ये यात्रेवर दगडफेक झाल्याचा आरोप
Rahul Gandhi, Bharat Jodo Nyay Yatra
Rahul Gandhi, Bharat Jodo Nyay Yatra Sarkarnama
Published on
Updated on

W. Bengal, Bihar News :

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची देशात चर्चा आहे. दोन दिवसांपासून ही यात्रा बिहारमधून असून आजच्या सभेनंतर राहुल गांधी यांची यात्रा प. बंगालमध्ये दाखल झाली. याचदरम्यान दोन मोठ्या घटना घडल्या. पहिली बिहारमध्ये, तर दुसरी बंगालमध्ये.

सकाळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधील (Bihar) कटिहारमध्ये होती. त्यावेळी सकाळी पदयात्रेमध्ये प्रचंड चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने राहुल गांधी सुखरूप आहेत. पण यात त्यांच्या कारचे नुकसान झाले. त्यानंतर त्यांच्या यात्रेने पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) प्रवेश केला.

Rahul Gandhi, Bharat Jodo Nyay Yatra
Sonia Gandhi News: सोनिया गांधी तेलंगणातून, तर प्रियांका रायबरेलीतून लोकसभा लढणार

न्याय मिळेपर्यंत यात्रा सुरू ठेवण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केला. त्यांनी यापूर्वी त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात त्यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) सुरू आहे. 29 जानेवारी रोजी या यात्रेने बिहारमध्ये प्रवेश केला. आज सकाळी कटिहारामध्ये राहुल गांधींची पदयात्रा सुरू असताना मोठी चेंगराचेंगरी झाली. एवढी की त्यांच्या गाडीचे नुकसान झाले.

या चेंगराचेंगरीनंतर चित्त विचलित न होता अतिशय शांतपणे राहुल गांधी कारमधून उतरून बसमध्ये बसले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा 18 वा दिवस आहे. जाहीर सभेनंतर त्यांच्या यात्रेने पश्चिम बंगालमध्ये पुन्हा प्रवेश केला. पश्चिम बंगालमधील मालदामधुन राहुल गांधी याची पदयात्रा जात असताना अचानक दगडफेक झाली. यात त्यांच्या गाडीची काच फुटली. हा हल्ला झाला त्यावेळी राहुल गांधी कारमध्ये नव्हते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधी काल कटिहारमध्ये मुक्कामी होते. सकाळी त्यांच्या पदयात्रेला प्रचंड गर्दी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोकांनी गर्दी केली होती. बिहारच्या मातीवर अन्यायाविरोधात सुरू असलेल्या न्यायाच्या महायात्रेला जनतेचे भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. न्याय हक्क मिळेपर्यंत हा प्रवास सुरूच राहणार आहे, असे राहुल गांधी या पदयात्रेत म्हणाले. यावेळी बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये यात्रेने आगमन केल्यानंतर त्यांच्यासोबत अधीर रंजन चौधरी आहेत.

बिहारमध्ये चेंगराचेंगरी आणि प. बंगालच्या मालदामध्ये राहुल गांधींवर हल्ला झाल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भारत जोडो न्याय यात्रेचा 14 जानेवारीला मणिपूरमध्ये प्रारंभ झाला. 67 दिवसांत 6 हजार 713 किलोमीटरचा 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून प्रवास करून मुंबईत येईल आणि 20 मार्च रोजी मुंबईत यात्रेची सांगता होईल.

(Edited by Avinash Chandane)

R...

Rahul Gandhi, Bharat Jodo Nyay Yatra
Lok Sabha Election 2024 : अखिलेश यांना पत्नीमुळे मोठा झटका; पक्षाच्या बड्या नेत्यानं सोडली साथ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com