Congress
Congress sarkarnama
देश

मोठी बातमी : ईडीचे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना समन्स; उद्या हजर राहण्याचे आदेश

सरकारनामा ब्यूरो

D. K. Shivakumar : नवी दिल्ली : कर्नाटक काँग्रेसचे (congress) अध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना ईडीने (ED) समन्स बजावले आहे. गुरुवारी समन्स जारी करून, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात 7 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या नवी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शिवकुमार उद्या ईडीच्या कार्यालयात येणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी बुधवारी डी. के. शिवकुमार यांच्या वडिलोपार्जित संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली. शिवकुमार यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली. सीबीआयने बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी शिवकुमार यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता.

सीबीआय अधिकाऱ्यांनी बुधवारी शिवकुमार यांच्या कनकापुरा, दोडलहल्ली, सांते कोडिहल्ली येथे असलेल्या मालमत्ता आणि त्यांच्याशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली. त्यासोबतच सीबीआय अधिकाऱ्यांनी कनकपुरा तहसीलदार आणि पोलिसांचीही भेट घेतली होती.

ईडीने शिवकुमार यांना समन्स पाठवले कारण 'भारत जोडो यात्रे'ला भारतीय जनता पक्ष घाबरला आहे, असा आरोप काँग्रेसने गुरुवारी केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ईडीने समन्स पाठवले आहे, असे पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

शिवकुमार यांनी गुरुवारी सांगितले की, ईडीने 'नॅशनल हेराल्डशी' संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 7 ऑक्टोबर रोजी बोलावले आहे. त्यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी दुसरी तारीख द्यावी, असा अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज ईडीने फेटाळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT