Eknath Shinde criticize to Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार-खासदारांसह अयोध्याच्या दौऱ्यावर आहेत. रामलल्लाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री अयोध्येत दाखल झाले आहेत. आज दिवसभर ते अयोध्येत असणार आहेत. तसेच शरयूकाठी ते पूजन करणार आहेत. दरम्यान, शिंदे यांनी या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेते यांनी केलेल्या टीकेवर त्यांनी पलटवार केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरून जोरदार टीका केली होती.आदित्य म्हणाले, "ज्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय अवस्था असेल, ज्या राज्यात शेतकरी आत्महत्या करत असतील, ज्या राज्यात महिलांवरअत्याचार वाढलेले असतील, ते हिंदुत्वाचं राज्य नाही, रावण राज्य आहे. हे रामराज्य असू शकत नाही. आणि यांना अयोध्याला जाण्याचा काहीच अधिकार नाही, असे जोरदार टीकास्त्र ठाकरेंनी केले.
एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर पलटवार करताना म्हणाले, "रावणराज म्हणणे हा प्रभू रामांचा अपमान आहे. धनुष्यबाण प्रभू रामाचं आहे. तर हा रामाचा अपमान आहे. रावणराज्य जे म्हणत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं, मॉब लिंचिंग झालं, त्यावेळी कोणाचं सरकार होतं? दाऊदशी ज्याचे संबंध आहेत त्या नवाब मलिकांचा राजीनामा नाही घेऊ शकले. याकूब मेननच्या कबरीचं उदात्तीकरण कोणी केलं, तेव्हा कोणाचं सरकार होतं त्यामुळे रावणाचं राज्य जे होतं, त्यांच्या पापाचा घडा भरला म्हणून जनतेने ते हटवलं," असं ते म्हणाले.
एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे शनिवारीच अयोध्या दौऱ्यात दाखल झाले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सकाळी अयोध्येत दाखल झाले. यावेळी शिंदे यांचं अयोध्येत जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. यानंतर अयोध्येतील रामसेतू पार्क येथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदयात्रेला सुरूवात झाली. रामसेतू पार्क ते राम मंदिर अशी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.