Aditya Thackeray On CM Eknath Shinde : ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला, असा आरोप त्यांनी ठाकरे गटाने केला. या मारहाणीत रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना गंभीर दुखापत झाल्याची बाब समोर आली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे संतप्त होऊन, शिंदे गट व भाजपला इशारा दिला होता. याच विरोधात आता महाविकास आघाडीने मोर्चा काढला होता.
या मोर्चानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयकडे मोर्चा वळवला यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरून जोरदार टीका केली.
आदित्य म्हणाले, "ज्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय अवस्था असेल, ज्या राज्यात शेतकरी आत्महत्या करत असतील, ज्या राज्यात महिलांवरअत्याचार वाढलेले असतील, ते हिंदुत्वाचं राज्य नाही, रावण राज्य आहे. हे रामराज्य असू शकत नाही. आणि यांना अयोध्याला जाण्याचा काहीच अधिकार नाही, असा जोरदार टीकास्त्र ठाकरेंनी केले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह येत्या ९ एप्रिलला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. तसेच यावेळी ते शरयू नदीची आरती देखील करणार आहेत. याच दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदेवर टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
''अयोध्या आणि शिवसेनेचे अनेक वर्षांपासून एक नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच राममंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतल्यानंतर राम मंदिराच्या बांधकामाचीही मी पाहणी करणार आहे. अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. आम्ही याकडे राजकारण म्हणून कधी पाहिलं नाही आणि पाहणार देखील नाही'', अस मु्ख्यमंत्री म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.