Election Commission News Sarkarnama
देश

Election Commission Action : निवडणूक आयोग मालामाल! मतदानाआधीच पावणेपाच हजार कोटी ताब्यात

Rashmi Mane

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांची घोषणा, अर्ज दाखल करण्याची धावपळ, बंडखोरी, प्रचार सभा, नाराजीनाट्य, भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अशा सर्व घडामोडींमुळे सुरू आहे. त्यामुळे देशात निवडणुकीपूर्वी वातावरण चांगले तापले आहे. राजकीय माहोल तयार होत असतानाच लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.

देशात सात टप्प्यांत मतदान होणार असून, आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडण्याआधीच कारवायांसंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत सांगितले आहे की, निवडणूक आयोगाकडून 1 मार्चपासून सरासरी दररोज 100 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी एकूण 4,650 कोटी रुपयांची रोकड, ड्रग्ज आणि दारू जप्त केली असून, एकूण जप्तीपैकी 45 टक्के अमली पदार्थांचा वाटा आहे. 1 मार्चपासून झालेल्या कारवाईमुळे 2019 च्या संसदीय निवडणुकीत जप्त केलेल्या 3,475 कोटी रुपयांचा आकडादेखील या वेळेस पार केला आहे.

75 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी जप्ती

लोकसभा निवडणुकीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जप्ती असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) 2019 मध्ये आयोगाने 3475 कोटी रुपये जप्त केले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये एकूण 7502 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. अशाप्रकारे जानेवारी ते 13 एप्रिलपर्यंत एकूण 12 हजार कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.

देशात दररोज 100 कोटी रुपये जप्त केले जात आहेत.

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) रिपोर्टनुसार तपासणीदरम्यान दररोज सुमारे 100 कोटी रुपये जप्त करण्यात येत आहेत. 1 मार्चपासून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये 2068.85 कोटी रुपयांची ड्रग्ज, 1142.49 कोटी रुपयांच्या वस्तू, 562.10 कोटी रुपयांची मौल्यवान धातू, 489.31 कोटी रुपयांची रोकड आणि 395.39 कोटी रुपयांची रोकड यांचा समावेश आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT