Kolhapur Lok Sabha Election 2024 : आक्षेपार्ह विधाने टाळा, जिल्हाधिकारी अमोल येडगेंचा इशारा

Martahi News : निवडणूक विभागाच्या मीडिया सेलच्या माध्यमातून प्रत्येक बातमीवर तसेच भाषणांवर लक्ष ठेवले जात आहे. प्रत्येक बातमी आणि भाषणाची विविध समित्यांच्या माध्यमातून तपासणी होऊन पुढील कार्यवाही केली जात आहे.
Assembly Election 2024
Assembly Election 2024Sarkarnama

Kolhapur News : ‘लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. राजकीय नेत्यांनी आक्षेपार्ह विधाने टाळावीत, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही. निवडणूक विभागाच्या मीडिया सेलच्या माध्यमातून प्रत्येक बातमीवर तसेच भाषणांवर लक्ष ठेवले जात आहे. प्रत्येक बातमी आणि भाषणाची विविध समित्यांच्या माध्यमातून तपासणी होऊन पुढील कार्यवाही केली जात आहे’, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे (Sanjay shinde), निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, आदी उपस्थित होते. (Kolhapur Lok Sabha Election 2024 )

Assembly Election 2024
Loksabha Election 2024 : शाहू महाराजांच्या आडून सर्वांना सामावून घेणाऱ्या विचारांवर हल्ला!

जिल्हाधिकारी येडगे (amol yedge) म्हणाले, ‘राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत उद्या, शनिवारी बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी वक्तव्ये सर्वांनी टाळावीत, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतील एकूण ३ हजार ३६८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेसाठी एकूण १८ हजार ४५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे पहिले प्रशिक्षण झाले आहे.

दुसरे प्रशिक्षण २६ व २७ एप्रिलला विधानसभा मतदारसंघस्तरावर होणार आहे. तिसरे प्रशिक्षण सहा मे रोजी सर्व विधानसभा मतदारसंघस्तरावर घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर निवडणूक काळात एकूण आजअखेर १५४६ शस्त्रे जमा झालेली आहेत. पोलिसांकडून ३०१५ समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रांगा

‘मतदानासाठी तृतीयपंथीयांकरिता स्वतंत्र रांगा करण्यात येणार आहेत. तसेच मतदान केंद्रांवर तृतीयपंथीय आल्यानंतर त्यांना तत्काळ मतदान करू द्यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत’, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Assembly Election 2024
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट; चहा-नाश्ता-जेवणासह प्रचाराच्या माणसांचा 'रेट'ही ठरला!

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com