EC action fake news elections : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांसह इतरत्र ठिकाणी सुरू असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील बेकायदेशीर अन् दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे.
निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत, 11 हजारांहून अधिक सोशल मीडिया पोस्ट्स ओळखून, त्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मजकूर हटविणे, गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, आयटी नियम 2021 आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. विशेषतः AI साहाय्याने तयार केलेला किंवा फेरफार केलेला कोणताही भ्रामक अथवा बेकायदेशीर मजकूर निदर्शनास आल्यानंतर संबंधित सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मनी 3 तासांच्या आत कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राजकीय पक्ष, उमेदवार आणि प्रचार प्रतिनिधींनी प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या AI-आधारित किंवा डिजिटलरीत्या बदललेल्या मजकुरावर “AI-Generated”, “Digitally Enhanced” किंवा “Synthetic Content” अशी स्पष्ट नोंद करण्याची सूचना निवडणूक आयोगाने (Election Commission) बंधनकारक केली आहे.
आसाम, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभांच्या निवडणुकादरम्यान सोशल मीडियावरील आचारसंहिता भंग करणारे, कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणू शकणारे किंवा मतदान प्रक्रियेविषयी चुकीची माहिती पसरवणारे पोस्ट्सवर संबंधित राज्यांच्या आयटी नोडल अधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेवून तात्काळ कारवाई केली जात आहे, असेही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
15 मार्चला निवडणुकांची घोषणा झाली. तेव्हापासून आतापर्यंत 11 हजारांहून अधिक सोशल मीडिया पोस्ट्सवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मजकूर हटविणे, गुन्हे नोंदवण्याची देखील कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 126 अंतर्गत मतदान संपण्यापूर्वीच्या 48 तासांच्या शांतता कालावधीत कोणत्याही प्रकारचे निवडणूक प्रचार साहित्य प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिक, राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ECINET वरील C-Vigil अॅपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 15 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत एकूण 3,23,099 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी 96.01 टक्के म्हणजेच 3,10,393 तक्रारींचे निकाली काढण्यात आल्याचे भारत निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.