

Yavatmal missing girls : यवतमाळच्या राळेगाव इथल्या 34 बेपत्ता मुलींविषयी आदिवासी मंत्री अशोक उइके यांनी मोठा खुलासा केला आहे. हा विषय हिंदू समाजाबाबत घडला आहे, आदिवासी विषय घेणं योग्य नाही, असा मंत्री उइके यांनी म्हटलं आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी या प्रकरणात लव जिहाद अन् धर्मांतराची शंका व्यक्त करत पोलिसांकडे उच्चस्तरीय चौकशी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पहिल्यापासून ज्यावर संशय व्यक्त केला जात आहे, तो मजहर कुरेशी याच्यासह 15 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
आदिवासी मंत्री अशोक उइके यांनी म्हटलं आहे की, हे प्रकरण समोर येताच, भाजप (BJP) जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी देखील युद्ध पातळीवर चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात पहिल्यापासून ज्याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत होता, त्या मजहर कुरेशी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणात बालविवाह कायद्याअंतर्गत एकावर गुन्हा (Crime) दाखल देखील झाला आहे. मजहर कुरेशी याच्याबरोबर 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. पोलिसांच्या चौकशी काय निष्कर्ष बाहेर येतोय, त्यानंतर पुढची कारवाई ठरवण्यात येईल, असेही मंत्री अशोक उइके यांनी म्हटलं आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास कसा काय सुरू आहे, याची देखील माहिती घेतली आहे. पोलिसांची योग्य दिशेनं कारवाई सुरू आहे. पोलिसांकडून पुढील पंधरा दिवसाच्या आत योग्य ती कारवाई होईल. पोलिसांकडून कोणतेही अँगल तपास सुटणार नाही, अशा सूचना दिल्याचे मंत्री अशोक उइके यांनी सांगितले.
हे प्रकरण खूप गंभीर आहे. हिंदू समाजाच्या मुलींबाबत, असा प्रकार घडलेला आहे. बाललैंगिक शोषणाचा देखील प्रकार यात घडलेला आहे. आदिवासीच्या मुलींचा विषय घेणं, तो काही योग्य वाटत नाही. हिंदू समाजाबाबत जे काही घडत आहे. कमी वयाच्या मुलींबाबत प्रकार घडत आहे, त्यावर पोलिस लक्ष ठेवू तपसात करत आहे, असे मंत्री उइके यांनी सांगितले.
दरम्यान, राळेगाव आदिवासी समाजाच्या 34 मुली बेपत्ता प्रकरणात संशयित आरोपी मजहर कुरेशी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संशयित आरोपी पुरूष महिला, असे एकुण पाच जणांकडे कसून चौकाशी सुरू आहे. मजहर कुरेशीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. संशयित आरोपी कुरेशी यानं केलेल्या अतिक्रमणावर राळेगाव नगरपालिकेने बुलडोझर कारवाई देखील केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.