Gyanesh Kumar Chief Election Commissioner of India Sarkarnama
देश

Gyanesh Kumar Big Decision: वाद पेटल्यानंतर निवडणूक आयोगाचे मोठे पाऊल; फॉर्म-6 बाबतचा 'हा' नियम अखेर रद्द!

Form 6 rule cancelled by Election Commission : Form 6 बाबतच्या वादानंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. SIR घोषणापत्र, नवीन मतदार नोंदणी आणि ECINET वरील बदलांबाबत जाणून घ्या ताजी माहिती.

Rashmi Mane

Election Commission : मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Form-6 संदर्भात निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेशी संबंधित अतिरिक्त घोषणा पत्र आता काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील Form-6 मधून हटवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तिथे नव्या मतदारांना आता केवळ मतदार नोंदणी नियम, 1960 अंतर्गत असलेला नियमित Form-6 भरावा लागणार आहे.

बुधवारी रात्रीपर्यंत ECI Net पोर्टल तसेच संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाइटवर हा बदल दिसून आला. मात्र, ज्या राज्यांमध्ये SIR प्रक्रिया अद्याप सुरू आहे, तिथे Form-6 सोबतचे अतिरिक्त घोषणा पत्र कायम असल्याचे दिसत आहे.

नेमका वाद कशावरून झाला?

मतदार यादीच्या SIR प्रक्रियेदरम्यान Form-6 च्या ऑनलाइन अर्जात एक अतिरिक्त भाग जोडण्यात आला होता. या घोषणेमध्ये नव्या मतदाराकडे किंवा त्याच्या आई-वडिलांकडे अथवा आजी-आजोबांकडे मागील SIR दरम्यान तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नाव होते का, अशी माहिती विचारली जात होती. नाव असल्यास बूथ आणि क्रमांकाची माहिती देण्यासही सांगितले जात होते.

26 सप्टेंबरच्या बैठकीनंतर बदल?

या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर 26 सप्टेंबर रोजी झालेल्या पूर्ण निवडणूक आयोगाच्या बैठकीकडेही लक्ष वेधले जात आहे. त्यानंतर SIR पूर्ण झालेल्या राज्यांमध्ये Form-6 वरील अतिरिक्त घोषणा पत्र हटवण्यात आल्याचे दिसून आले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने Form-6 मध्ये थेट कोणताही बदल केल्याचा दावा नाकारला होता. आयोगाच्या म्हणण्यानुसार, नियमित Form-6 मध्ये सुधारणा करण्यात आलेली नव्हती, तर SIR प्रक्रियेसाठी त्यासोबत अतिरिक्त घोषणा पत्र जोडण्यात आले होते. आता SIR पूर्ण झालेल्या ठिकाणी ही अतिरिक्त माहिती मागवण्याची गरज नसल्याने ती व्यवस्था हटवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT