

SSC HSC Exam Fee Waiver : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षेसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत सर्व विभागीय मंडळांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विविध सवलती जाहीर केल्या आहेत. मदत व पुनर्वसन विभागाने 25 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त म्हणजेच 10 वी आणि उच्च माध्यमिक 12 वीच्या बोर्ड परीक्षेसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही. या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न आकारता भरून घेण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहेत.
या निर्णयामुळे दुष्काळाचा फटका बसलेल्या कुटुंबांमधील विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेषतः 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबावरील अतिरिक्त आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा शुल्कातून मोठा दिलासा मिळणार असून, आगामी 2027 बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.
राज्य मंडळाने सर्व विभागीय मंडळांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ याबाबत माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच परीक्षा शुल्क न घेता आवेदनपत्रे भरून घेण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची, याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार आहेत. तसेच संबंधित विभागीय मंडळांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करायचा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.