Election Commission Sarkarnama
देश

Haryana Election : मोठा निर्णय! हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल, जम्मू-काश्मिरचा निकाल कधी?

Roshan More

Haryana Election News: निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. 90 जागांसाठी आता 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.

निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला लागणार आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर करण्याची घोषणाही आयोगाने केली आहे. यापूर्वी दोन्ही राज्यांचे निकाल 4 ऑक्टोबरला लागणार होते.

हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान होते. मात्र, पंजाब, राजस्थान आणि हरियाणातील अनेक कुटुंबे गुरु जंभेश्वरांच्या स्मरणार्थ बिकानेर जिल्ह्यातील 'असोज' महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी उत्सवात सहभागी होण्यासाठी जातात. आणि हा उत्सव 2 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नसता. त्यामुळे मतदानाची तारीख बदलण्याची विनंती राजकीय पक्षांकडून तसेच धार्मिक संघटनांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.

हरियाणामधील सिरसा, फतेहाबाद आणि हिस्सार येथील हजारो बिष्णोई कुटुंब मतदानाच्या दिवशी राजस्थानला रवाना होतील, त्यामुळे ते 1 ऑक्टोबरला मतदानाचा हक्क बजावू शकली नसती, त्यामुळे निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

भाजपने निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चौधरी उदयभान म्हणाले होते की, भाजपला पराभव समोर दिसत आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचे निमित्त वापरून त्यांना निवडणूक पुढे ढकलायची आहे. मात्र, जनतेने भाजपला पराभूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT