BJP and Kolhapur Vidhan Sabha : ... म्हणून महायुतीच्या जागा वाटपात कोल्हापुरात भाजपला बसणार फटका?

Mahayuti and Kolhapur Assembly Election : तर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा जास्त जागांवर दावा असून त्या खालोखाल अपक्ष आणि राष्ट्रवादीला संधी मिळण्याची शक्यता आहे.
Mahayuti Melava
Mahayuti MelavaSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : महायुतीत कोल्हापुरात जिल्ह्यातील दहा पैकी किती जागा महायुतीच्या मित्र पक्षांकडे असणार आहेत, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. तर भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपक्षांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील तीन अपक्षांना सोबत घेतल्याने जागा वाटपासंदर्भात भाजपची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला एक किंवा दोनच जागेवर समाधान मानावे लागणार आहे. तर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा जास्त जागांवर दावा असून त्या खालोखाल अपक्ष आणि राष्ट्रवादीला संधी मिळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास चार जागेवरील चित्र स्पष्ट आहे. कोल्हापूर दक्षिण राधानगरी, शाहुवाडी आणि कागल विधानसभा मतदारसंघातील जागा कोणाकडे जाणार याबाबत पूर्ण स्पष्टता मिळाली असून, उमेदवार बऱ्यापैकी स्पष्ट झाला आहे. त्यामुळे या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र उर्वरित सहा जागांवरून महायुतीतील चार पक्षांमध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे. त्यातील दोन जागांवर उमेदवार फिक्स आहेत.

Mahayuti Melava
Kolhapur Election : कोल्हापुरात महाविकास आघाडीत पुन्हा काँग्रेसच ठरणार स‘तेज’?

पण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा कोणत्या पक्षालाही जागा जाणार यावर बरसं काही अवलंबून आहे. इचलकरंजी विधानसभाचे आमदार प्रकाश आवाडे आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अपक्षचा नारा दिला आहे. या दोघांनाही पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वांचा दबाव असल्याचे सांगितले जाते.

कोल्हापुरात भाजपने कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, इचलकरंजी, चंदगड या विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. सध्या परिस्थितीला कोल्हापूर दक्षिण मध्ये माजी आमदार अमल महाडिक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. ही एकमेव जागा सोडल्यास भाजपला दुसरा मतदारसंघ मिळणे कठीण आहे. कोल्हापूर उत्तर वर शिवसेना शिंदे गटाने देखील दावा केल्याने भाजप आणि शिवसेनेत(Shivsena) प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

चंदगड मध्ये विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्याने ही जागा भाजपच्या वाट्याला येणे सध्या तरी शक्य नाही. इचलकरंजीतून आमदार प्रकाश आवडे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. मात्र ही जागा भाजपला गेल्यास सुरेश हळवणकर यांची नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला जिल्ह्यात एक किंवा दोन जागेवर समाधान मानावे लागेल.

Mahayuti Melava
Kolhapur Politics : 'वस्ताद येत आहेत' म्हणत पालकमंत्र्यांविरोधात समरजित घाटगेंनी ठोकला शड्डू, थेट मुश्रीफांच्या दारातच पक्षप्रवेश

शिवसेना शिंदे गटाने कोल्हापूर उत्तर, राधानगरी, इचलकरंजी, हातकणंगले आणि करवीर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. कोल्हापूर उत्तर मधून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर, राधानगरीतून आमदार प्रकाश अबिटकर, करवीर मधून माजी आमदार चंद्रदीप नरके, इचलकरंजी मधून आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची शक्यता अधिक आहे.

तर हातकलंगले मधून आयता उमेदवार घेण्याच्या तयारीत शिवसेना शिंदे गट आहे. मात्र सध्या परिस्थिती पाहता शिवसेना शिंदे(Eknath Shinde) गटाला केवळ करवीर, कोल्हापूर उत्तर, आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावर समाधान मानावे लागेल असे चित्र आहे.

राष्ट्रवादी अजित पवार(Ajit Pawar) गटाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केवळ कागल चंदगड आणि शिरोळ मतदार संघावर दावा केला आहे. कागल मधून विद्यमान आमदार पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगड मधून आमदार राजेश पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर शिरोळ मधून राजेंद्र पाटील यड्रावकर यांना राष्ट्रवादीतून संधी देण्याच्या संकल्पना पुढे येत आहेत. जिल्ह्यातील दोन किंवा तीनच जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com