Vijay Wadettiwar : भाजप-शिंदे गटाला अजित पवार का नको ? विजय वडेट्टीवार यांनी कारण सांगून टाकलं

Vijay Wadettiwar Ajit Pawar Eknatha Shinde : अजित पवार यांनी विधानसभेत 60 जागांची मागणी केली आहे. 40 जागांवर त्यांना तडजोड करण्यास सांगण्यात येईल. अन्यथा बाहेरचा रस्ता दाखवाल जाईल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Vijay Wadettiwar Ajit Pawar Eknatha Shinde
Vijay Wadettiwar Ajit Pawar Eknatha Shindesarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar News : तानाजी सावंत यांच्या 'उलटी'च्या वक्तव्यावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात चांगलाच वाद रंगला आहे. एकमेकांवर उघडपणे आरोप केले जात आहे. या वादात आता विरोधकांनीही उडी घेतली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीतून अजित पवार यांना बाहेर काढण्यासाठी हे सर्व आरोप ठरवून केले जात असल्याचा दावा केला आहे.

लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने अजित पवार यांना महायुतीत घेतले होते. त्याचा काहीएक फायदा युतीला झाला नाही. त्यामुळे ते आता ते नकोसे झाले आहेत, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

राज्यातील इतर मतदारसंघातही राष्ट्रवादी सोबत असल्याचा फायदा महायुतीला झाला नाही. यापूर्वी भाजपच्याही अनेक कार्यकर्त्यांनी पवारांची साथ सोडण्याची मागणी केली होती. आता शिंदे गटाला सत्तेत आणखी वाटेकरी नको आहे. सुमारे दोन वर्ष मांडीला मांडी लावून बसल्याने आता एकमेकांना बघून अचानक उलट्या कशा काय यायला लागल्या? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadettiwar Ajit Pawar Eknatha Shinde
BJP and Kolhapur Vidhan Sabha : ... म्हणून महायुतीच्या जागा वाटपात कोल्हापुरात भाजपला बसणार फटका?

अजित पवार यांनी विधानसभेत 60 जागांची मागणी केली आहे. 40 जागांवर त्यांना तडजोड करण्यास सांगण्यात येईल. अन्यथा बाहेरचा रस्ता दाखवाल जाईल. महायुतीत जाऊन अजित पवार यांचा निर्णय चुकला. ते महाविकास आघाडीत असते तर राष्ट्रवादीच्या वाट्याला किमान 100 जागा आल्या असत्या, असाही टोला वडेट्टीवार यांनी लागावला.

यावेळी भाजप जितक्या जास्त जागेवर लढले तेवढा फायदा काँग्रेसला अधिक होईल असाही दावा यावेळी वडेट्टीवार यांनी केला. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. सिटींग-गेटींग हे सूत्र राहील. विदर्भात काँग्रेस, मुंबईत उद्धव सेना तर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसला प्राधान्य देण्यात येईल. उर्वरित ठिकाणी आपसात बसून तीनही पक्ष जागा वाटपाचा निर्णय घेईल असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Vijay Wadettiwar Ajit Pawar Eknatha Shinde
Manohar Joshi : दावा भाच्याचा, पण मामा झाले मुख्यमंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com