MLA Abhay Patil Sarkarnama
देश

MLA Abhay Patil news : मतदारयादीतून नावे हटवली, भाजप आमदार अभय पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोरच दिली कबुली! मुख्यमंत्र्यांनीच जाहीरपणे सांगितले...

Karnataka SIR, DK Shivakumar, Abhay Patil, Karnataka voter list : मतदारांच्या माहितीच्या अशाप्रकारे वापराची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणीही मुख्यमंत्र्‍यांनी केली आहे.

Rajanand More

Form 7 controversy : कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या SIR प्रक्रियेत नव्या वादाला तोंड फुटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या फॉर्म ७ चा गैरवापर करून भाजप नेते, पदाधिकारी मतदारांची नावे हटवत असल्याचा आरोप होत आहे. त्यामध्ये आता खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उडी घेतली आहे. भाजप आमदार अभय पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच याबाबत कबुली दिल्याचेही त्यांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्र्‍यांनी गुरूवारी कर्नाटकातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी गंभीर आरोपही केली. कर्नाटकमध्ये षडयंत्र रचण्यात आले असून अनेक नावे बेकायदेशीरपणे वगळली जात आहेत. आधीच मतदारांच्या नावांसह छापण्यात आलेले फॉर्म सात भाजप कार्यकर्त्यांना दिले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्‍यांनी मागण्यांचे निवेदनही दिले आहे. मागील आठवड्यात २२, २३ आणि २४ सप्टेंबर रोजी विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळण्यासाठी फॉर्म सात दाखल करण्यात आले आहेत. या मतदारांमध्ये अल्पसंख्यांक, एससी, एसटी आणि ओबीसींचे लक्षणीय प्रमाण आहे. त्यांचे नावे आधीपासून फॉर्म सातवर छापली असून त्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्‍यांनी केला आहे.

मतदारांच्या माहितीच्या अशाप्रकारे वापराची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणीही मुख्यमंत्र्‍यांनी केली आहे. ठराविक मतदारांना लक्ष्य करून जाणीवपूर्वक वगळण्याचे षडयंत्र रचल्याचीही चौकशी करावी, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे. दरम्यान, खुद्द मुख्यमंत्र्‍यांनीच निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन तक्रारींचा पाढा वाचल्याचे मागील काही वर्षांत पहिल्यांदाच घडल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे फॉर्म 7?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही फॉर्म ७ च्या गैरवापरावर बोट ठेवले आहे. निवडणूक आयोगाचा फॉर्म ७ (Form 7) हा मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी किंवा नावाच्या समावेशावर आक्षेप घेण्यासाठी वापरला जातो. मतदार यादीतून स्वतःचे किंवा इतर कोणाचेही नाव कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवण्यासाठी या अर्जाचा वापर केला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT