Election Commission news : राहुल गांधींचे तीन प्रश्न अन् निवडणूक आयोगातील बड्या महिला अधिकाऱ्याचे नाव अचानक चर्चेत; आरोपांची धार वाढली...

Rahul Gandhi, Seema Khanna, Election Commission of India, Form 6 controversy : राहुल गांधी यांच्या पोस्टनंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, केरळ काँग्रेसने आयोगाच्या आयटी विभागाच्या महासंचालक डॉ. सीमा खन्ना यांचे नाव घेतले आहे.
Rahul Gandhi has questioned the authority behind changes to online Form 6, while ECI Director General IT Seema Khanna has come under political scrutiny.
Rahul Gandhi has questioned the authority behind changes to online Form 6, while ECI Director General IT Seema Khanna has come under political scrutiny.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

ECI Form 6 row : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधी पक्षांकडून सातत्याने जोरदार हल्ला चढविला जात आहे. निवडणूक आयुक्तांमधील मतभेद समोर येताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना थेट माफीचा साक्षीदार होण्याचा सल्ला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. आता त्यांनी पुन्हा एकदा फॉर्म ६ बाबत संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर आयोगातील एका बड्या महिला अधिकाऱ्याचे नाव चर्चेत आले आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ऑनलाइन फॉर्म ६ मध्ये बेकायदेशीरपणे बदल करण्यात आल्याचा दावा आयोगातील आयुक्तांनी केला आहे. आयोगातील कुणी हा बदल करण्याचे आदेश टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला दिले? TCSमध्ये या बदलाला अंतिम मंजुरी कुणी दिली? हा बदल करण्यासाठी त्यांच्यावर कुणी दबाव आणला होता का?, असे तीन प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहे.

राहुल यांच्या या पोस्टनंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, केरळ काँग्रेसने आयोगाच्या आयटी विभागाच्या महासंचालक डॉ. सीमा खन्ना यांचे नाव घेतले आहे. केरळ काँग्रेसने सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, मोदी-शाह आणि ज्ञानेश कुणार यांच्यासोबत ‘व्होट चोरी’मागील मास्टरमाइंड, कोण आहे, ते जाणून घ्या.

Rahul Gandhi has questioned the authority behind changes to online Form 6, while ECI Director General IT Seema Khanna has come under political scrutiny.
Congress news : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा पहिला बळी ; खासदाराने सोडलं महत्वाचं पद, पक्षाला धक्का

डॉ. सीमा खन्ना या २०२५ पासून आयोगात आयटी विभागाच्या महासंचालक आहेत. ज्ञानेश कुमारही त्याचवर्षी आयुक्त झाले. त्या अमित शहांच्या निकटवर्ती असल्याचे सांगितले जाते. आयोगातील सर्व महत्त्वाची आयटीशी संबंधित कामे त्याच हाताळतात. मतदार यादीत फेरफार करण्याचे नियंत्रण त्यांच्या हातात असल्याचा आरोप केरळ काँग्रेसने केला आहे.

पारदर्शकतेसाठी विरोधकांनी डिजिटल मतदार याद्या मागितल्यानंतर आयुक्तांनी आम्हाला मोठी खोली भरून जाईल एवढ्या छापील मतदार याद्या दिल्या. बूथवरील CCTV फुटेज मागितल्यानंतर महिलांचा उल्लेख करत उत्तर दिले. त्यामुळे फॉर्म ६ मध्ये बेकायदेशीर बदल करण्याचे निर्देश TCSला कोणी दिले, या प्रश्नाचे उत्तरही यातून बऱ्यापैकी स्पष्ट होते, असे केरळ काँग्रेसने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Rahul Gandhi has questioned the authority behind changes to online Form 6, while ECI Director General IT Seema Khanna has come under political scrutiny.
भाजपला हादरा देणारा विरोधी पक्षाचा उमेदवार; अर्ज दाखल केल्यानंतर काही तासांतच मंत्र्यांसोबत

गुन्हेगार, देशद्रोही

महुआ मोइत्रा यांनीही सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एक गुन्हेगार. एक देशद्रोही. एक सायबर दहशतवादी. लोकशाहीला हानी पोहोचवण्यासाठी सॉफ्टवेअरचा बेकायदेशीर वापर करणारी व्यक्ती, आयोगाच्या आयटी विभागाच्या महासंचालक सीमा खन्ना. नाव, चेहरा लक्षात ठेवा. लपण्यासाठी कितीही खोल खड्डा शोधला, तरी तो पुरेसा खोल असणार नाही, असे मोइत्रा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com