Arvind Kejariwal And Priyanka Gandhi  Sarkarnama
देश

Election Commission Notice : निवडणूक आयोगाची मुख्यमंत्री केजरीवाल अन् प्रियंका गांधींना नोटीस; 'हे' आहे कारण

Arvind Kejariwal And Priyanka Gandhi : पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Deepak Kulkarni

New Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फेसबुक तसेच ट्विटरवर बदनामीकारक टिप्पणी केल्याप्रकरणी ही नोटीस बजावली आहे. यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (Narendra Modi) सोशल मीडियावर करण्यात आलेल्या बदनामीकारक टीका- टिप्पणीवरुन भाजपने १० नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर "अत्यंत अस्वीकार्य" आणि "अनैतिक" व्हिडिओ क्लिप आणि टिप्पण्या पोस्ट केल्याबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली होती. आता निवडणूक आयोगाने याप्रकरणी मोठं पाऊल उचललं आहे. याबाबतची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) आणि प्रियंका गांधी यांच्यावर 'बदनामीकारक टिप्पणी' केल्याचा आरोप करण्यात आला आहे.याप्रकरणी निवडणूक आयोगाने मंगळवारी कारणे दाखवा नोटीस जारी केली.याचवेळी आयोगाने काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या नोटिशीत निवडणूक आयोगाने त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या आरोपाला उत्तर देण्याचे निर्देश देण्यास सांगितले आहे.आपच्या राष्ट्रीय संयोजकांना नोटीस बजावण्यात आली आहे.मात्र, केजरीवाल हेच पक्षाचे राष्ट्रीय संयोजकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

काय आहे प्रकरण...?

आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवरुन मागील बुधवारी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांची व्हिडिओ स्टोरी शेअर करण्यात आली होती. तसेच दुसऱ्या दिवशी अदानी आणि मोदींचा फोटो पोस्ट करत पंतप्रधान लोकांसाठी काम करत नसून उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा हल्लाबोल करण्यात आला होता.यावरुन भाजपने रान उठवत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT